ETV Bharat / bharat

Bridge Collapsed In Bihar : वादळ आलं अन् बांधकाम सुरु असलेला पूल पत्त्यासारखा कोसळला.. - ईटीवी न्यूज

बिहारच्या भागलपूरमधील सुलतानगंजमध्ये बांधकाम सुरु असलेला अगुवानी पूल किरकोळ वादळ आणि पावसामुळे ( under construction bridge collapsed in sultanganj ) कोसळला. जेडीयूचे आमदार ललित नारायण मंडल यांनी बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या अपघातात सुदैवाने अनेकांचे प्राण वाचले ( Bridge Collapsed In Bihar ) आहेत.

Bridge Collapsed In Bihar
बांधकाम सुरु असलेला पूल पत्त्यासारखा कोसळला
author img

By

Published : Apr 30, 2022, 6:42 PM IST

भागलपूर/सुलतानगंज ( बिहार ) : भागलपूरच्या सुलतानगंजमध्ये बांधकाम सुरु असलेला अगुवानी पूल किरकोळ वादळालाही तग धरू शकला ( under construction bridge collapsed in sultanganj ) नाही. सुमारे 1,710 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला हा पूल शुक्रवारी कोसळला. या अपघातात जीवित व वित्तहानी झाली नसली तरी, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पुलाचा भाग कोसळत असताना तेथे लोकं नसल्याने अनेकांचे प्राण वाचले ( Bridge Collapsed In Bihar ) आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार ललित नारायण मंडल, मंडळ अधिकारी शंभूशरण राय आणि ब्लॉक विकास अधिकारी मनोज कुमार मुर्मू घटनास्थळी पोहोचले.

आमदाराने केला भ्रष्टाचाराचा आरोप : घटनास्थळी पोहोचलेले जेडीयूचे आमदार ललित नारायण मंडल यांनी या पुलाच्या बांधकामाबाबत खळबळजनक आरोप केले आहेत. पुलाच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आगवणी पुलाच्या बांधकामाचा दर्जा खराब आहे. तुरळक वादळ आणि पावसात पुलाचा ढाचा ढासळणे हा भ्रष्टाचाराचा परिणाम आहे. आगवणी पुलाची पाहणी यापूर्वी करून त्यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बांधकाम करताना दर्जाची काळजी घेण्याचे निर्देश दिले होते.

या अपघाताची निष्पक्ष आणि सखोल चौकशी झाली पाहिजे. पुलाचे बांधकाम सुरू असताना झालेल्या गडबडीमुळे हा अपघात झाला. या पुलाच्या पडझडीला कोण जबाबदार आहे, याचा तपास करून शोध घेण्याची गरज आहे. -जेडीयू आमदार ललित नारायण मंडल

23 फेब्रुवारी 2014 रोजी पायाभरणी : हा पूल बिहार सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. गंगा नदीवर बांधण्यात येत असलेल्या आगवानी-सुलतानगंज पुलासाठी सुमारे 1,710 कोटी रुपये खर्च आला आहे. त्याची एकूण लांबी सुमारे 3.160 किमी आहे. या पुलाची पायाभरणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते 23 फेब्रुवारी 2014 रोजी खगरिया जिल्ह्यातील परबट्टा येथे करण्यात आली होती. 9 मार्च 2015 रोजी त्यांनी पुलाचे बांधकाम सुरू करण्यासाठी उद्घाटन केले. खगरिया बाजूपासून 16 किमी लांबीचा रस्ता आणि सुलतानगंज बाजूपासून 4 किमी लांबीचा रस्ता तयार होत आहे.

त्याच्या निर्मितीमुळे, उत्तर बिहार देखील मिर्झा चौकीद्वारे थेट झारखंडशी जोडला जाईल. विक्रमशिला सेतूवरील वाहनांचा ताणही कमी होणार आहे. त्याचवेळी, श्रावणी मेळ्यादरम्यान, खगरियाहून भागलपूरला जाण्यासाठी कावडीयांना 90 किमीऐवजी केवळ 30 किमीचा प्रवास करावा लागणार आहे.

हेही वाचा : Massage In Police Station : पोलीस ठाण्यातच महिलेकडून करून घेतला मसाज.. अधिकाऱ्याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.