ETV Bharat / bharat

Nag Panchami 2022 : नागचंद्रेश्वर मंदिराचे दरवाजे सोमवारी मध्यरात्री उघडले; केवळ 24 तास मिळणार दर्शन - नागचंद्रेश्वर मंदिराचे दरवाजे उघडले

वर्षातून एकदा उघडणाऱ्या नागचंद्रेश्वर मंदिराचे दरवाजे सोमवारी मध्यरात्री बारा वाजता ( Ujjain nagchandreshwar temple opened ) उघडण्यात आले. भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी प्रशासनाकडूनही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

Nagchandreshwar Temple
नागचंद्रेश्वर मंदिराचे दरवाजे उघडले
author img

By

Published : Aug 2, 2022, 9:46 AM IST

Updated : Aug 2, 2022, 10:47 AM IST

उज्जैन - वर्षातून एकदा उघडणाऱ्या नागचंद्रेश्वर मंदिराचे दरवाजे सोमवारी मध्यरात्री बारा वाजता ( Ujjain nagchandreshwar temple opened ) उघडण्यात आले. भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी प्रशासनाकडूनही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी भाविकांना पायी पुलाच्या माध्यमातून दर्शन घडवले जात आहे. यावेळी उच्च शिक्षण मंत्री डॉ. मोहन यादव, कृषी मंत्री कमल पटेल आणि प्रशासकीय अधिकारी पूजेला उपस्थित होते.

मंदिराचे दृश्य

हेही वाचा - Nagpanchami Festival 2022 : नागपंचमीच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम!

नागपंचमीच्या दिवशीच खुले असते मंदिर - नागचंद्रेश्वर मंदिर वर्षातून केवळ नागपंचमीच्या दिवशी २४ तास खुले असते. केवळ याच दिवशी मंदिरातील दुर्मिळ मूर्ती सर्वसामान्य भाविकांना पाहायला मिळतात. नागचंद्रेश्वर मंदिरात दर्शनासाठी सोमवारी सायंकाळी सात वाजल्यापासूनच भाविकांची रांग लागली होती. मंदिराचे दरवाजे २४ तास खुले राहतील. या दरम्यान लाखो भाविक येण्याची शक्यता आहे.

प्राचिन काळापासून सुरू आहे परंपरा - भारतीय पंचांग तिथीनुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला मंदिराचे दरवाजे उघडण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. परमार राजा भोजने हे मंदिर इसवी सन 1050 च्या सुमारास बांधले, असे मानले जाते. यानंतर सिंधिया घराण्याचे महाराज राणोजी सिंधिया यांनी १७३२ मध्ये महाकाल मंदिराचा जिर्णोद्धार करून घेतला. दुर्मिळ मूर्ती नेपाळमधून आणून मंदिरात बसवण्यात आल्याचे सांगितले जाते.

अशी होती पूजा - नागपंचमीला अखाड्याच्या परंपरेनुसार, नागदेवतेची त्रिकाल पूजा केली जाते. सोमवारी रात्री 12 वाजता पहिली पूजा महानिर्वाणी अखाड्यातर्फे करण्यात आली. दुसरी पूजा मंगळवारी दुपारी 12 वाजता होणार आहे. यामध्ये शासनाचे सहकार्य असेल. सोमवारी सायंकाळी महाकालच्या आरतीनंतर तिसरी पूजा होईल. मंदिर व्यवस्थापन समिती ते पूर्ण करेल. मंदिराच्या पूजेत सहभागी झालेले राज्याचे कृषी मंत्री कमल पटेल आणि उच्च शिक्षण मंत्री डॉ. मोहन यादव यांनी नागचंद्रेश्वर मंदिराची पूजा विनोद गिरी महाराज यांच्यासह केली.

हेही वाचा - On Occasion of Nagpanchami Festival : जिवंत नागांची पूजा करणाऱ्या बत्तीस शिराळा गावाची गाथा

Last Updated : Aug 2, 2022, 10:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.