ETV Bharat / bharat

Mobile Game Side Effect : आईने ऑनलाईन गेम खेळण्यास दिला नकार; नाराज होऊन मुलाने सोडले घर, जाणून घ्या पुढे काय झाले - mother scolds boy left home ujjain

उज्जैनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेव्हा आईने ऑनलाइन मोबाइल गेम खेळण्यास नकार दिला तेव्हा 15 वर्षीय किशोर घर सोडून इंदूरला पळून गेला. तो मुंबईला जाण्याच्या तयारीत होता, मात्र वेळीच पोलिसांनी त्याला सुखरूप शोधून काढले. मुलाने सांगितले की पालक त्याला फिरायला घेऊन जात नाहीत किंवा ऑनलाइन गेम खेळू देत नाहीत. त्यामुळे त्याने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आणि सायकल घेऊन शाळेत जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर ( Online mobile game dangerous for children ) पडला.

Mobile Game Side Effect
Mobile Game Side Effect
author img

By

Published : Jun 22, 2022, 10:29 PM IST

उज्जैन: कोरोनानंतर मुलांचा स्क्रीन टाइम खूप वाढला आहे. कोरोनाच्या काळापासून मुले मोबाईलचा इतका वापर करू लागली आहेत की त्यांची ही सवय झाली आहे. सोशल साइट्सच्या वापराच्या व्यसनामुळे मानसिक आजारी पडू लागली आहेत. सोशल नेटवर्किंग साइट्स आणि ऑनलाइन गेम्सच्या दुष्परिणामांची अनेक प्रकरणे समोर येत राहतात. तसेच ऑनलाइन गेमने अनेक मुलांना गुन्हेगार बनवले आहे. त्याचे दुष्परिणाम उज्जैनमधून समोर आले आहेत. जिथे गे खेळायला आईने नकार दिला म्हणून मुलाने नाराज होऊन घर सोडले ( Online Gaming Addiction ) आणि मुंबई शहराचा रस्ता धरला.

आईने ऑनलाईन गेम खेळण्यास दिला नकार, नाराज होऊन मुलाने सोडले घर

सायकलने पोहोचला इंदूरला: मकसी रोडवरील कैलास एम्पायर कॉलनीत राहणारा 15 वर्षीय किशोर इयत्ता 8वीचा विद्यार्थी आहे. त्याच्या आईने त्याला ऑनलाइन मोबाइल गेम खेळल्याबद्दल फटकारले, तेव्हा तो घरातून निघून गेला. मुलाने आईचे बोलणो इतके गांभीर्याने ( mother scolds boy left home ujjain ) घेतले की, शाळेत जाण्याऐवजी तो सायकलने थेट इंदूरला गेला. तो घरी न परतल्याने घाबरलेल्या पालकांनी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी सायबर टीमच्या मदतीने काही तासांतच इंदूरमधील मरीमाता चौराहा येथून मुलाला रेस्क्यू केले.

सोबत घेऊन गेला होता आईचा मोबाईल - सीएसपी विनोद कुमार मीणाने सांगितले की, मुलगा आईचा मोबाईल सोबत घेऊन गेला होता. ज्यामुळे त्याला ट्रेस करुन त्याच्या लोकेशनचा पत्ता आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला शोधण्यात आम्हाला यश आले. चौकशीत किशोरने सागिंतले की, आई-बाप त्याला कुठे फिरायला घेऊन जात नाहीत आणि त्याला गेम खेळू देत नाहीत. या कारणामुळे त्याला मुंबईला जायचे होते. दरम्यान मुलाला पालकाकडे देण्यापूर्वी त्याला चाइल्ड केयरकडे सुपुर्द केले गेले, जिथे त्याची व्यवस्थित चौकशी केली जाऊ शकेल. ज्यामुळे त्याने पुढे जाऊन असे पाऊल पुन्हा उचलू नये.

मुलाला सोशल नेटवर्किंग साइट्स चालवण्याची आणि ऑनलाइन मोबाइल गेम खेळण्याची सवय ( Online mobile game side effect in Ujjain ) आहे. जेव्हा त्याला त्याच्या आईने या सर्व गोष्टीपासून रोखण्याचा प्रयन्त केला, तेव्हा त्याने घर सोडून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. शाळेला जाण्याऐवजी तो आईचा मोबाईल घेऊन सायकलवरुन इंदूरसाठी निघाला. माझा सल्ला आहे की मुलांनी पालकांवर जास्त लक्ष दिले पाहिजे, त्यांच्या सोबत फिरायला गेले पाहिजे. - विनोद कुमार मीणा, सीएसपी

पालकांनी मुलांशी मित्रासारखे वागावे : सीएसपी विनोद कुमार मीना यांनी कुटुंबातील सदस्यांना सूचना देताना पालकांनी मुलांना वेळ द्यावा, असे सांगितले. मुलांशी बोला आणि त्यांचे मन जाणून घ्या. त्यांना मित्रांसारखे वागवा. ते म्हणाले की, जेव्हा मुलांना पालकांकडून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, तेव्हा ते त्यांच्या आवडीनुसार उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात. आणि अशी पावले वारंवार उचलतात (Online mobile game dangerous for children) घ्या.

हेही वाचा - हेल्मेट घालून या! ...नाहीतर चपलांचा प्रसाद भेटेल, कार्यकर्त्याच्या पोस्टनंतर उदेमवार सतर्क;पहा व्हिडीओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.