उज्जैन(मध्य प्रदेश) - एका शाळेत शिक्षक लव्ह लाईफ लेसन (Love Life Lesson) मुलींना शिकवत होते. तसेच ते अश्लील स्पर्श करत असल्याचा आरोप शाळेतील मुलींनी केला आहे. याविरोधात शनिवारी सकाळी मुलींच्या पालकांनी शाळेत पोहोचून गोंधळ घातला. पालकांनी शिक्षक व शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात घोषणाबाजी (Ujjain Crime News) केली. काँग्रेसचे आमदार महेश परमारही हेदेखील घटनास्थळी पोहोचले होते. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून पोलिसही शाळेत पोहोचले. पोलिसांनी प्रकरण शांत केले आणि चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन कुटुंबीयांना दिले, अशी माहिती एसडीओपी राजाराम यांनी दिली आहे. तसेच शिक्षकाला लवकरच अटक करण्यात येईल. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.
शाळा बंद करण्याची पालकांची मागणी - शाळा बंद करण्याबरोबरच संपूर्ण कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. कुटुंबीयांना माहिती देताना मुलांनी सांगितले होते की, शाळेचे शिक्षक लिजो सर अनेक दिवसांपासून लव्ह लाईफचे धडे शिकवत होते आणि वाईट स्पर्श केला जात होता. याबाबत मुलांनी तक्रार केली. या कृत्यात संपूर्ण शाळाच दोषी असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
काय आहे प्रकरण - शाळेतील शिक्षक लिजो हे मुलांना वर्गात लव्ह लाईफबद्दल शिकवत होते. या बहाण्याने ते मुलींच्या प्रायव्हेट भागाला स्पर्श करत असल्याचा आरोप पीडित मुलींनी केला आहे. याबद्दल मुलींनी शाळा प्रशासनाकडे तक्रार देखील केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे मुलींनी सांगितले आहे.