अमरावती - प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. आधआक कार्ड नसल्यास अनेक कामात अडचणी निर्माण होतात. आंध्र प्रदेशमधील रहिवासी असलेल्या आई आणि मुलीचा आधार क्रमांक एकच होता. त्यामुळे दोघींनाही अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेऊन प्रशासनाने दोघींना युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यूआयडीएआय क्रमांक दिला आहे.
अनंतपूर जिल्ह्यातील चैन्नी कोटापल्ली मंडळ अंतर्गत वेल्डुरथी गावातील सुब्बम्मा आणि जयम्मा यांना यूआयडीएआय क्रमांक एकच होता. त्यामुळे त्यांना त्रासाला सामोरे जावे लागले. आधारक्रमांक दुरुस्त करण्यासाठी त्यानी अनेकदा सेवा केंद्राच्या कार्यालयात फेऱ्या घातल्या. मात्र, त्यांचे कोणीही ऐकून घेतले नाही. यूआयडीएआय क्रमांक एकच असल्याने त्यांना मनेरगा योजनेचाही लाभ मिळत नव्हता. तसेच इतर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी त्या अयोग्य ठरत होत्या.
अखेर 'ईटीव्ही भारत'ने याबाबत वृत्त प्रकशित केले. तसेच हा विषय लावून धरला. वृत्त प्रकाशीत होताच गावातील सॉफ्टवेअर अभियंता श्रीनाथ रेड्डी यांनी यूआयडीएआय अधिकाऱ्यांना याची माहिती मेलद्वारे दिली. याचा परिणाम म्हणून, सर्व मुद्रण आणि स्कॅनिंग उपकरणे घेऊन अधिकारी सबब्म्मा आणि जयम्मा यांच्या घरी पोहोचले.
दोघींनीही ईटीव्ही भारतचे मानले आभार -
याचा परिणाम म्हणून, सर्व मुद्रण आणि स्कॅनिंग उपकरणे घेऊन अधिकारी सुब्बम्मा आणि जयम्मा यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर डोळे आणि बोटाचे ठसे घेतल्यानंतर दोघींना वेगवेगळ्या यूआयडीएआय क्रमांकाची वेगवेगळी आधार कार्ड दिली. समस्याचे सोडवल्यामुळे सुब्बम्मा आणि जयम्मा दोघींनीही ईटीव्ही भारतचे आभार मानले.
हेही वाचा - 'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट - एसटीच्या १३०० सुरक्षा रक्षकांना मिळणार थकीत वेतन