नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आज UGC NET परीक्षा 2022 चा निकाल जाहीर करेल. उमेदवार परीक्षेच्या अधिकृत वेबसाइटवर ugcnet.nta.nic.in तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी शुक्रवारी सकाळी ही घोषणा केली होती. UGC NET परीक्षा 8, 10, 11, 12, 13 आणि 14 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित केली होती.
UGC NET 2022 ची उत्तर पत्रिकाआणि अंतिम उत्तर पत्रिका प्रसिद्ध झाली आहे. 2021 मध्ये एकूण 1266509 उमेदवारांनी UGC NET साठी नोंदणी केली होती, त्यापैकी 671288 उमेदवार बसले होते आणि 43730 परीक्षा उत्तीर्ण झाले होते. देशभरातील विद्यापीठे आणि इतर उच्च शिक्षण संस्थांमध्ये ज्युनियर प्रोफेसर फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी UGC NET परीक्षा घेतली जाते. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही.
UGC NET Result 2022 असे तपासा
- निकाल जाहीर झाल्यानंतर UGC NET वेबसाइट ugcnet.nta.nic.in जाऊन निकाल बघा.
- मुख्यपृष्ठावर UGC NET Result 2022 च्या लिंकवर जावा.
- लॉगिन तपशील भरा आणि सबमिट बटण दाबा.
- आता निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- डाउनलोड करण्यासाठी त्यावर क्लिक करा आणि वापरासाठी प्रिंटआउट घ्या.