ETV Bharat / bharat

Two Nigerians Arrested : बँकेचे सर्व्हर हॅक करून कोट्यावधी रुपये लुटले, दोन नायजेरियन नागरिकांना अटक

author img

By

Published : Jan 13, 2023, 8:15 PM IST

तामिळनाडू सहकारी बँकेचे सर्व्हर हॅक करून दोन कोटींहून अधिक रुपये लुटणाऱ्या दोन नायजेरियन नागरिकांना केंद्रीय गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करत 32 बनावट बँक खाती तयार करून ही फसवणूक केल्याची तपासात पुष्टी झाली आहे.

Two Nigerians Arrested
दोन नायजेरियन नागरिकांना अटक

चेन्नई : तामिळनाडू सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय मन्नादी, चेन्नई येथे आहे. 18 नोव्हेंबर रोजी सायबर दरोडेखोरांनी या बँकेचे सर्व्हर हॅक करून बँकेतील 2.61 कोटी रुपये लुटले होते. याबाबत बँक अधिकाऱ्यांनी चेन्नई पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली. चेन्नई सेंट्रल क्राइम ब्रँच सायबर क्राइम पोलिसांनी या प्रकरणी जलद कृती करत दरोडेखोरांनी ज्या बँक खात्यांमधून पैसे ट्रान्सफर केले होते ते ब्लॉक केले. त्यांच्याकडून दीड कोटी रुपये जप्त केले गेले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात विविध धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एक कोटी रुपये क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित केले : गेल्या ऑगस्टमध्ये बँकेतील इंटरनेट सेवेसह कार्यरत असलेल्या संगणकावर फिशिंग मेल पाठवण्यात आला होता. त्याद्वारे की लॉगर सॉफ्टवेअर हे अधिकाऱ्यांची पोचपावती न घेता डाऊनलोड करण्यात आले. मग त्यांनी संगणकाच्या हालचालींवर लक्ष ठेवले आणि डेटा गोळा केला. स्वीट 32 अटॅक म्हणून ओळखल्या जाणार्‍या सायबर हल्ल्याच्या माध्यमातून सहकारी बँकेच्या सर्व्हरवर प्रवेश करून संपूर्ण नेटवर्क नियंत्रणात आणल्याचे तपासात उघड झाले आहे. बारकाईने नियोजन करून माहिती संकलन केल्यानंतर नोव्हेंबरमध्ये ही रक्कम चोरीला गेल्याचे उघड झाले. नायजेरियातील दोन बँक खात्यांद्वारे binance नावाच्या वेबसाइटद्वारे एक कोटी रुपये क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित केल्याचेही आढळून आले.

32 बनावट बँक खात्यांद्वारे फसवणूक : घटनेनंतर पोलिसांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. सायबर गुन्हेगारांनी वापरलेल्या कॉम्प्युटरच्या आयपी अॅड्रेसच्या शोधात ते उत्तम नगर, दिल्ली येथून कार्यरत असल्याचे उघड झाले. विशेषतः, नायजेरियन दरोडेखोरांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून 32 बनावट बँक खाती तयार करून ही फसवणूक केल्याची तपासात पुष्टी झाली.

अनेक नायजेरियन या कामात गुंतले आहेत : त्यानंतर उत्तम नगरमधील पोलिसांनी सखोल शोध घेतला आणि अॅग्नेस गॉडविन आणि ऑगस्टीन या दोन नायजेरियन नागरिकांना अटक केली. त्यांनी 8 हजारांचे घर भाड्याने घेत संगणक वापरून फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. गुजरात सहकारी बँकेतही त्यांनी सायबर हल्ला करून पैसे लुटल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोन सायबर दरोडेखोरांना पोलिसांच्या विशेष पथकाने १२ जानेवारी रोजी चेन्नईत आणले होते. सायबर क्राइम पोलिस त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याचा विचार करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, हजारो नायजेरियन नागरिक विविध मार्गांनी दिल्लीच्या उत्तम नगरमध्ये प्रवेश करत आहेत आणि रात्रीच्या वेळी असे सायबर दरोडे घालत आहेत.

हेही वाचा : Drugs Seized in Navi Mumbai : रो-हाऊसमधून एक कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त, १६ नायजेरियन नागरिकांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.