ETV Bharat / bharat

Boulder Falling From The Mountain : डोंगरावरून कोसळले भलेमोठे दगड, दोन घरे जमीनदोस्त, थरकाप उडविणारा व्हिडिओ

author img

By

Published : Jul 30, 2022, 10:06 AM IST

पिथौरागढ जिल्ह्यातील धारचुलामध्ये मुसळधार पावसामुळे ( Pithoragarh heavy rain ) मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसानंतर डोंगरावरून ढिगारा आणि भलेमोठे दगड पडल्याने दोन घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली ( Two houses collapsed in Dharchula ) आहेत. सुदैवाने लोक वेळेत घराबाहेर पडले, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. तुम्ही पण पहा व्हिडिओ...

Boulder Falling From The Mountain
Boulder Falling From The Mountain

पिथौरागढ: सीमावर्ती जिल्ह्यातील पिथौरागढच्या धारचुला मल्ली बाजारमध्ये हृदय हेलावणारे चित्र समोर आले आहे. मुसळधार पावसानंतर ( Pithoragarh heavy rain ) डोंगरावरून ढिगारा आणि दगड पडल्याने धारचुलामध्ये दोन घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली ( Two houses collapsed in Dharchula ) आहेत. शुक्रवारी सायंकाळी उशिरा झालेल्या मुसळधार पावसानंतर डोंगरावरून ढिगाऱ्यासह मोठमोठे दगड खाली कोसळले. दरड कोसळत असल्याचे पाहून घरातील सदस्य कसेबसे बाहेर पडले आणि त्यांनी आपला जीव वाचविला. निसर्गाच्या कहराचा हा व्हिडिओ समोर आला आहे. तो व्हिडिओ पाहून तुमच्या अंगाचा थरकाप उडेल.

डोंगरावरून कोसळले भलेमोठे दगड, दोन घरे जमीनदोस्त

सुदैवाने लोक वेळेत घराबाहेर पडले, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. मात्र, काही वेळातच मलबा आल्याने दोन्ही घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली. दोन्ही कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय इतर अनेक घरांचेही किरकोळ नुकसान झाले आहे. ढिगारा आल्यानंतर आणखी 14 घरांनाही धोका निर्माण झाला असून, पोलीस प्रशासन घरे रिकामी करत आहेत.

मल्लीबाजारचे रहिवासी नारायण लाल वर्मा यांच्या घराचे ढिगारा पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. डोंगरावरून दगड कसे पडत आहेत हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. लोकांची आरडाओरड सुरू आहे. लोक घरातून पळून जात आहेत. सध्या पोलीस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी परिस्थितीचा आढावा घेण्यात व्यस्त आहे.

हेही वाचा - Koshyari controversial statement: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान; म्हणाले मुंबईतून गुजराथी राजस्थानी गेले तर आर्थिक राजधानीची ओळख मिटेल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.