ETV Bharat / bharat

Marriage Of Two Daughters In Meerut: मेरठमध्ये दोन मुलींचे 'एकमेकांशी लग्न; नातेवाईकांकडून मारहाण - Two girls beaten up for marrying each other in Meerut

मेरठमध्ये दोन मैत्रिणींनी लग्न केले आहे. ( Marriage Of Two Daughters In Meerut ) ही बाब दोघींच्या कुटुंबीयांना समजताच एकच गोंधळ उडाला. नातेवाइकांनी दोघांनाही मारहाण केली. दरम्यान, हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By

Published : Jun 30, 2022, 9:29 PM IST

मेरठ (उत्तर प्रदेश) - जिल्ह्यातील दोन मैत्रिणी एकमेकांच्या प्रेमात पडल्या. त्या फक्त प्रेमातच पडल्या नाहीत तर त्यांनी लग्नही केले आहे. तसेच, एकमेकींसोबत जगण्याची शपथ घेतली आहे. ( Two Girls Beaten Up For Marrying Each Other In Meerut ) दरम्यान, हा प्रकार घरच्यांना कळताच एकच गोंधळ उडाला. त्यानंतर संंतप्त नातेवाईकांनी दोघांनाही बेदम मारहाण केल्याचीही माहिती समोर आली आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

दोघीही एकमेकांच्या प्रेमात पडल्या - एक मुलगी मेडिकल पोलीस स्टेशन हद्दीतील शास्त्रीनगर येथील रहिवासी आहे. तर, दुसरी मुलगी लालकुर्ती येथील रहिवासी आहे. दोन्ही मुलींनी बी. कॉमचे शिक्षण एकत्रच केले होते. यानंतर दोघेही एकत्र काम करण्यासाठी नोएडाला गेले. तिथे दोघे एकाच खोलीत एकत्र राहू लागले. यादरम्यान दोघीही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली आणि गुपचूप लग्न केले.

घरच्यांना याची माहिती मिळाली - लालकुर्ती येथे राहणाऱ्या मुलीच्या कुटुंबीयांना हा प्रकार कळताच त्यांनी तिला घरी आणून तिच्यावर पाळत ठेवली. असे सांगितले जात आहे की दोघेही कोर्टात लग्नाची तयारी करत होते. त्याच दरम्यान घरच्यांना याची माहिती मिळाली. दोन्ही मित्रांना नातेवाईकांनी बेदम मारहाण केली आहे.

कुटुंबीयांनी मुलींना समजवण्याचा प्रयत्न केला - हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी दोन्ही मुलींशी बोलल्यावर रडत रडत सर्व प्रकार सांगितला. यासंदर्भात सीओ सिव्हिल लाईन्स देवेश सिंह सांगतात की, कुटुंबीयांनी मुलींना समजवण्याचा प्रयत्न केला की ती जे करत आहे ते कायदेशीरदृष्ट्या योग्य असले तरी ते योग्य नाही. दोन्ही पक्षांना समजावून घरी पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा - Tree Planted In Auto: ऑटो चालकाने ऑटोत केले वृक्षारोपण; पहा, काय आहे प्रयोग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.