ETV Bharat / bharat

दैव बलवत्तर! रेल्वेखाली येऊनही दोनजण वाचले

धावत्या मालवाहू रेल्वेखाली दोघे पडल्याची घटना घडली. मात्र दोघांना कोणतीही दुखापत झाली नसून सुखरुप बाहेर आले. ही घटना नेल्लौरे जिल्ह्यातील गुडूर रेल्वे जंक्शन स्थानकावर घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

दोघेही बचावले
दोघेही बचावले
author img

By

Published : May 20, 2021, 9:38 PM IST

नेल्लौरे (आंध्र प्रदेश) - धावत्या मालवाहू रेल्वेखाली दोघे पडल्याची घटना घडली. मात्र दोघांना कोणतीही दुखापत झाली नसून सुखरुप बाहेर आले. ही घटना नेल्लौरे जिल्ह्यातील गुडूर रेल्वे जंक्शन स्थानकावर घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

रेल्वे खाली येऊनही दोघांना कोणतीही दुखापत नाही

आज (गुरुवार) सकाळी साडे सहा वाजताच्या दरम्यान रेल्वे स्थानकावर एक व्यक्ती आला. दरम्यान रेल्वे पटरीवरुन मालवाहू गाडी जात होती. गाडीतील गार्डच्या डब्यात तो चढण्याचा प्रयत्न करु लागला. हा प्रकार तेथील रेल्वे कर्मचारी रूप कुमार यांच्या लक्षात आला. रूप कुमार यांनी तात्काळ त्या व्यक्तीकडे धाव घेतली. मात्र त्याचवेळेस चढण्याचा प्रयत्न करत असलेल्या व्यक्तीचा हात सुटला आणि खाली कोसळला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात रुप कुमार देखील खाली कोसळले. गाडी पुढे गेल्यानंतर इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांनाही बाहेर काढण्यात आले. सुदैवाने दोघांनाही कोणतीही दुखापत झाली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.