ETV Bharat / bharat

ऋषीकोंडा समुद्रकिनाऱ्यावर दोन विविध घटनांमध्ये 2 व्यक्तींचा मृत्यू - दोन बुडाले ऋषीकोंडा समुद्रकिनारा

ऋषीकोंडा समुद्रकिनाऱ्यावर आज दोन विविध घटनांमध्ये 2 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Jan 2, 2022, 10:52 PM IST

विशाखापट्टणम (आं.प्र) - ऋषीकोंडा समुद्रकिनाऱ्यावर आज दोन विविध घटनांमध्ये 2 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - Major Dhyan Chand Sports University : पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी

पोलिसांनुसार, ओरिसा राज्याच्या भाद्रक जिल्ह्यातील पाच विद्यार्थी आणि तेलंगणा राज्यातील सिंकदराबाद येथील 8 युवक असे दोन विविध गट आज समुद्रकिनाऱ्यावर आले होते. येथे मोठ्या लाटांचा तडाखा बसल्याने दोन्ही गटांतील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

सिकंदराबाद येथील 8 युवक हे दुपारी पोहण्यासाठी गेले होते. मात्र, त्यातील तिघा जणांना मोठ्या लाटेचा तडाखा बसला. त्यातील एक सी.एच शिवा याला बचाव पथकाने किनाऱ्यावर आणले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. इतर दोन युवक के. शिवा आणि मोहम्मद अजीज हे अजूनही बेपत्ता आहे. त्यांचा शोध सुरू आहे.

ओरिसा येथील 5 विद्यार्थ्यांच्या गटातील सुमित्र त्रिपाठी हा मोठ्या लाटेचा तडाखा बसल्यानंतर बुडाला होता. नंतर त्याचा मृतदेह किनाऱ्यावर वाहून आला. इतर 5 जण सुरक्षित किनाऱ्यावर आले. दोन्ही व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी केजीएचमध्ये पाठवण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा - Sant Kalicharan Troubles Increased : कालिचरण महाराजांना अटक करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे पथक रायपूरमध्ये

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.