बंगळुरू - कर्नाटकमधील बंगळुरूजवळ असलेल्या देवाराचीक्कानहाळीमध्ये आगीची मोठी घटना घडली आहे. देवाराचीक्कानहाळीमधील अशिर्थ अपार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या संख्येत वाढ होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
देवाराचीक्कानहाळीमधील अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर फ्लॅटमध्ये अडकलेल्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आगीचा भडका उडाला असताना ही महिला लोखंडी ग्रीलमुळे अपार्टमेंटमधून बाहेर पडू शकत नाही. दुसरीकडे आगीच्या ज्वालांनी तिला वेढल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. महिला ही आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असताना अपार्टमेंटबाहेर जमा झालेले नागरिक तिला वाचविण्यासाठी धावा करत होते.
हेही वाचा-महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरण; सुसाईड नोट हाती लागली, त्यात लिहिलंय...
फ्लॅटमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. त्यानंतर ही आग संपूर्ण अपार्टमेंटमध्ये पसरत गेली. अग्नीशमन दलाचे तीन जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. आग नियंत्रणात आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा-महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यू प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून चौकशी व्हावी-अखिलेश यादव
दरम्यान, गॅस सिलिंडरची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी, असा पेट्रोल कंपनीकडून ग्राहकांना नेहमी सल्ला दिला जातो. जेणेकरून घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस गळतीमुळे होणाऱ्या आगीच्या दुर्घटना टळू शकतात.
हेही वाचा-पोलिसांचा लॉजवर छापा; रुमधील टनेलमध्ये लपवल्या होत्या महिला, पाहा VIDEO