ETV Bharat / bharat

दरड कोसळण्याची दुर्घटना, पंतप्रधानांनी मदत करण्याचे दिले आश्वासन

हिमाचल प्रदेशमधील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. मदतकार्य करण्यासाठी शक्य ती मदत करण्याकरिता आश्वस्त केले आहे.

दरड दुर्घटना
दरड दुर्घटना
author img

By

Published : Aug 11, 2021, 4:50 PM IST

Updated : Aug 11, 2021, 10:26 PM IST

शिमला- हिमाचलमधील किन्नौर येथील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत दोन जणांचे मृतदेह ढिगाऱ्यातून काढण्यात आले आहे. तर 10 जणांची बचाव पथकाने सुटका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू असलेल्या मदतकार्याला शक्य तेवढी मदत करण्यात येणार असल्याचे ट्विट केले आहे. किन्नौर जिल्ह्यातील रेकॉँग पीओ-शिमला महामार्गावर नुगुलसरी येथे ही दरड कोसळण्याची दुर्घटना घडली आहे.

हिमाचल प्रदेशमधील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. मदतकार्य करण्यासाठी शक्य ती मदत करण्याकरिता आश्वस्त केले आहे.

पंतप्रधान कार्यालयाचे  ट्विट
पंतप्रधान कार्यालयाचे ट्विट

हेही वाचा-'ती' व्हायरल जाहिरात खरंच बुर्ज खलिफावर चित्रित झाली का? एमिरेटसने दिले उत्तर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ट्विटरवर हिमाचलमधील दुर्घटनेबाबत ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याशी चर्चा केली आहे. मदतकार्य करण्याची आयटीबीपीची आणि जखमींवर उपचार करण्याची स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ट्विट
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ट्विट

हेही वाचा-अफगाणिस्तानबाबत कतारमध्ये पाकिस्तानसह तीन देशांची होणार बैठक, भारताला वगळले!

घटनास्थळी मदतकार्य सुरू-

दरड कोसळण्याच्या घटनेत अनेक वाहने आणि 40 प्रवासी घेऊन जाणारी बस गाडली गेल्याचे किन्नौर जिल्ह्याचे उपायुक्त अबीद हुसेन सादिक यांनी सांगितले. दोन जणांचे मृतदेह ढिगाऱ्यातून काढण्यात आले आहेत. अद्याप घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेली बस ही हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची (HRTC) होती. या बसमध्ये 40 प्रवासी होते. ही बस किन्नौरमधील रेकाँग पीओवरून शिमलाच्या दिशेने जात होती. मदकार्यासाठी सैन्यदलाच्या राष्ट्रीय आपत्कालीन कृती दल (एनडीआरएफ) आणि स्थानिक बचाव पथकाला बोलाविण्यात आल्याचे उपायुक्त अबीद हुसेन सादिक यांनी सांगितले. दगड कोसळत असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत.

हेही वाचा-एम जे अकबर अब्रुनुकसान प्रकरण; दिल्ली उच्च न्यायालयाची पत्रकार प्रिया रमानी यांना नोटीस

Last Updated : Aug 11, 2021, 10:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.