प्रतापगड: जिल्हा रुग्णालयात अन्नातून विषबाधा झाल्याची तक्रारीनंतर दाखल करण्यात ( Whole family admit in hospital ) आलेल्या, एकाच कुटुंबातील 4 मुलांपैकी दोन मुलांचा अन्नातून विषबाधा झाल्याने मृत्यू ( (Two children died of food poisoning) झाला. दोघांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. कुटुंबातील अन्य तीन सदस्यांवर घंटाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
घंटाली पोलीस ठाण्याचे अधिकारी सोहनलाल यांनी सांगितले की, नालपाडा ग्रामपंचायतीच्या मांडव जेल गावात राहणाऱ्या भुरीबाई यांची मुलगी गुड्डी ही चार मुलांसह घरी आली होती. 18 जून रोजी संध्याकाळी गुड्डीने स्वयंपाक केला. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी जेवणही केले. थोड्या वेळाने सर्वांची प्रकृती ढासळू लागली. प्रत्येकाला उलट्या, जुलाब, मळमळ अशा समस्या येऊ लागल्या. यावर ग्रामस्थांच्या मदतीने सर्वांना घंटाली ( Incident of poisoning in Ghantali village ) प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले.
येथे 4 मुलांची प्रकृती चिंताजनक ( children is Condition critical ) झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान 2 वर्षांची मुलगी ललिता आणि 6 वर्षांचा मुलगा छोटू यांचा मृत्यू झाला. तर 2 मुले अजूनही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत. कुटुंबातील अन्य तीन जणांवर घंटाळी आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
पोलिस अधिकारी सोहनलाल ( Police Officer Sohanlal ) यांनी सांगितले की, कुटुंबातील सदस्यांनी गेल्या पावसात वाळलेली भेंडीची भाजी शिजवून खाल्ली होती. अशा परिस्थितीत कदाचित त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची समस्या निर्माण होऊन, संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य बिघडले असावे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दोन्ही मृत मुलांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.