उना ( हिमाचल प्रदेश ) : उना शहरात एक विचित्र विवाह प्रकरण समोर आले (Gay marriage in Una) आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका २४ वर्षीय तरुणाने उत्तराखंडमधील एका मुलाशी लग्न केले (Two boys get married) आहे. हे प्रकरण पोलिसांपर्यंतही पोहोचले असून, राज्यातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. उनामध्ये झालेल्या विचित्र लग्नाची (Two Youths Get Married) बातमी ऐकून लोकांना धक्का बसला असून, आता पोलीसही अस्वस्थ झाले आहेत.
असा झाला लग्नाचा गोंधळ - मिळालेल्या माहितीनुसार, उना शहरातील तरुण आपल्या लहान भावासोबत राहत होता. काही दिवसांपूर्वी तरुणाचा एक मित्र उत्तराखंडमधून त्याच्याकडे राहण्यासाठी आला होता. त्यानंतर धाकट्या भावाला दोघांवर संशय आला आणि त्याने याबाबत नातेवाईकांना माहिती दिली. यानंतर नातेवाइकांनी चांगलाच गोंधळ घातला आणि तरुणाचे लग्न एका मुलीशी लावून देण्याचे ठरवले. त्यानंतर दोन्ही तरुण पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आणि त्यांनी आपली संपूर्ण कहाणी सांगितली.
फेसबुकवर मैत्री, दिल्लीत लग्न - दोन्ही तरुणांच्या म्हणण्यानुसार, सुमारे दीड वर्षांपूर्वी दोघांची फेसबुकवर मैत्री झाली होती. त्यानंतर मैत्री वाढत गेली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण घरच्यांच्या भीतीमुळे दोघेही दिल्लीला पोहोचले. दोन्ही तरुणांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 6 महिन्यांपूर्वी दोघांचे दिल्लीतील एका मंदिरात लग्न झाले होते. त्यानंतर उना येथील तरुण आपल्या घरी परतला आणि काही दिवसांपूर्वीच उत्तराखंडचा तरुण येथे पोहोचला होता.
पोलिसांनी कुटुंबीयांना बोलावले - उना येथील दोन मुलांच्या लग्नाचे हे संपूर्ण प्रकरण उना पोलिसांसाठीही डोकेदुखी ठरले आहे. कारण दोन्ही तरुण कुटुंबीयांच्या भीतीने पोलिसांच्या आश्रयाला पोहोचले आहेत. चौकीचे प्रभारी जगवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुण एकत्र राहायचे असल्याचं सांगत आहेत. सध्या पोलिसांनी उत्तराखंडमधील तरुणाच्या नातेवाइकांनाही बोलावले असून, त्यानंतर पोलिस पुढील निर्णय घेणार आहेत.