ETV Bharat / bharat

Two Soldiers Drowned : जम्मू काश्मीरमध्ये नदीत बुडून लष्कराच्या दोन जवानांचा मृत्यू

जम्मू - काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात संततधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. शनिवारी लष्कराचे दोन जवान नदीत वाहून गेले होते. आज त्यांचे मृतदेह सापडले आहेत.

Two Soldiers Drowned
नदीत बुडून दोन जवानांचा मृत्यू
author img

By

Published : Jul 9, 2023, 4:47 PM IST

पुंछ : जम्मू - काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात शनिवारी भारतीय लष्कराचे दोन जवान नदीत वाहून गेले होते. याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. त्या दोघांचेही मृतदेह सापडले आहेत. नायब सुभेदार कुलदीप सिंग असे एका जवानाचे नाव आहे. आज आणखी एका जवानांचा मृतदेह सापडला. लान्स नाईक तेल्लू राम असे दुसऱ्या सैनिकाचे नाव असून तो पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील खराली गावचा रहिवासी होता.

  • During an Area Domination Patrol in difficult terrain of Poonch, L/Nk Telu Ram while crossing a mountainous stream got swept away due to flash floods. Nb Sub Kuldeep Singh , the Patrol leader while attempting to save L/Nk Telu Ram also laid down his life.
    GOC, @WhiteKnight_IA and… pic.twitter.com/LmeKlZXO1U

    — White Knight Corps (@Whiteknight_IA) July 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नदी ओलांडत असताना वाहून गेले : लष्कराच्या 16 कॉर्प्सचे कमांडिंग अधिकारी आणि जवानांनी कुलदीप सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 16 कॉर्प्सच्या ट्विटर पेजवर लिहिले आहे की, व्हाईट नाइट्स सर्व श्रेणीतील कॉर्प्स कमांडर आणि नायब सुभेदार कुलदीप सिंग यांच्या महान बलिदानाला सलाम करतात. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लष्कराचे हे जवान पूंछमधील सोरनकोटमधील पुशाना येथील डोग्रा नाला ओलांडत होते. परंतु अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे पाण्याच्या वेगवान प्रवाहात ते वाहून गेले.

लोकांना नदी/नाल्यांपासून दूर राहण्याचे आवाहन : अधिकाऱ्यांनी शनिवारी संध्याकाळी सांगितले की, लष्कर, पोलीस आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे संयुक्त पथक दोघांचा शोध घेत होते. परंतु अद्याप काहीही सापडले नाही. लष्कर आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदतकार्याचे निरीक्षण केले. दरम्यान, अतिवृष्टीनंतर लोकांना नदी आणि नाल्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यासाठी पोलिसांची वाहने जिल्ह्याच्या विविध भागात फिरत आहेत.

जम्मू - श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग पावसामुळे बंद : जम्मू - काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या आणि कालवे तुडुंब भरले आहेत. खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी थांबवावी लागली. कोणत्याही भाविकाला गुफेत जाण्याची परवानगी नाही. रामबन जिल्ह्यातील 270 किमी लांबीच्या जम्मू - श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. बोगद्याकडे जाणारा रस्ता वाहून गेल्याने जम्मू - श्रीनगर राष्ट्रीय महामार्गही बंद करण्यात आला आहे.

हे ही वाचा :

  1. Weather Update : उत्तर भारतात पावसामुळे हाहाकार, रस्ते जलमय ; चंदीगडमध्ये 23 वर्षांचा विक्रम मोडला!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.