बेळगाव कर्नाटकातील बेळगाव येथील आयटीबीटी कॅम्पमधून दोन एके ४७ रायफली चोरीला गेल्यात. वास्तविक 17 ऑगस्ट रोजी या रायफल चोरीला गेल्या होत्या. कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही ही चोरी झाल्यामुळे चिंता वाढली आहे. या दोन एके 47 रायफल इंडो तिबेट बॉर्डर पोलिस दलातील राजेश कुमार आणि संदीप मीणा यांच्या आहेत. मदुराईची 45 वी बटालियन ITBP फोर्स माओवादविरोधी मोहिमेत भाग घेण्यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी हलभावी येथे आली आहे.
17 ऑगस्ट रोजी रात्री बेळगाव जिल्ह्यातील हलभावी गावाच्या हद्दीतील आयटीबीटी ITBT कॅम्पमधून रायफल चोरीला गेल्या होत्या. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला. आजूबाजूला कडेकोट बंदोबस्त असला तरी, हल्लेखोर छावणीत घुसून शस्त्रे घेऊन पोबारा करण्यात यशस्वी झाले. सध्या, बेळगावी गुन्हे शाखेच्या डीसीपी पी व्ही स्नेहा यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक याचा तपास करत आहे. आयटीबीपीने काकती पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा सिसोदिया यांच्या घरावर सीबीआय छापेमारीनंतर भाजप नेत्यांचा हल्लाबोल