ETV Bharat / bharat

ट्विटरकडून अफगाणिस्तानचे काळजीवाहू अध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांचे ट्विटर अकाउंट बंद

ट्विटरने अमुरुल्लाह सालेह यांचे अधिकृत ट्विटर अकाउंट बंद केले आहे. त्याचबरोबर सालेह यांच्या संदर्भात असलेली इतर कार्यालयीन ट्विटर अकाउंटही बंद केली आहेत. सालेह पक्ष आणि इतर ट्विटरच्या अकाउंटने नियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई केल्याचा दावा करण्यात येत आहे.

अमरुल्लाह सालेह
अमरुल्लाह सालेह
author img

By

Published : Aug 19, 2021, 5:30 PM IST

हैदराबाद/काबुल- एकीकडे तालिबांनीचा धुडगूस तर दुसरीकडे ट्विटरचे अकाउंट बंद, अशा स्थितीला अफगाणिस्तानचे काळजीवाहू अध्यक्ष अमरुल्लाह सालेह सामोरे जात आहेत. कारण अफगाणिस्तानमध्ये राजकीय संकट निर्माण झाले असताना ट्विटरने अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांचे ट्विटर अकाउंट बंद केले आहे.

तालिबानींनी अफगाणिस्तानवर ताबा मिळविला आहे. त्यापूर्वीच अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी हे देश सोडून पळून गेले आहेत. त्यानंतर अफगाणिस्तानचे पहिले उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी स्वत:ला काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित केले आहे.

हेही वाचा-'... तर तालिबानसोबत भारताने राजनैतिक संबंध प्रस्थापित करावे'; माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचा सल्ला

ट्विटरने अमुरुल्लाह सालेह यांचे अधिकृत ट्विटर अकाउंट बंद केले आहे. त्याचबरोबर सालेह यांच्या संदर्भात असलेली इतर कार्यालयीन ट्विटर अकाउंटही बंद केली आहेत. सालेह पक्ष आणि इतर ट्विटरच्या अकाउंटने नियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई केल्याचा दावा करण्यात येत आहे.

हेही वाचा-अफगाण संकट : डेहराडूनमधील 83 अफगाण कॅडेटसचे भवितव्य अधांतरी

अमुरुल्लाह सालेह यांनी नुकतेच केले होते ट्विट

अमुरुल्लाह सालेह यांनी नुकतेच ट्विट करून आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की देशाने कायद्याचा आदर केला पाहिजे, हिसेचा नाही. पाकिस्तानला गिळण्यासाठी अफगाणिस्तान खूप मोठा आहे. ते तालिबान्यांना शासन करण्यासाठीदेखील मोठे आहे. तुमच्या इतिहासात दहशतवादी गटांपुढे झुकणे आणि अपमानीत होणे याबद्दलचा अध्याय होऊ देऊ नका, असा संदेशदेखील सालेह यांनी ट्विटद्वारे अफगाणिस्तानच्या जनतेस दिला आहे.

हेही वाचा-अफगाणिस्तानच्या अध्यक्षपदासाठी सालेह यांच्या उमेदवारीला अमेरिकेचा पाठिंबा

अफगाणिस्तानमध्ये अत्यंत भयावह स्थिती -

गेल्या दोन दशकांपासून अफगाणिस्तानात सुरू असलेल्या गृहयुद्धातून अमेरिका आणि नाटो सैन्याने माघार घेताच तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तान गेल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले. तालिबानच्या जुलमी राजवटीत राहण्यापेक्षा देश सोडण्याचा विचार करत आहेत. काबूलमधून बाहेर जाणाऱ्या विमानांमध्ये बसण्यासाठी नागरिकांची झुंबंड उडाली आहे. काबूल विमानतळावरील नागरिकांची अत्यंत भयावह स्थिती आहे. विमानतळावरील परिस्थितीचे अनेक व्हिडिओ आणि फोटोज सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.