ETV Bharat / bharat

Twitter India : ट्विटरचे एमडी मनीष माहेश्वरी यांची उचलबांगडी; नवीन जबाबदारीसह पाठवले अमेरिकेत - मनीष माहेश्वरी

ट्विटर इंडियाचे संचालक मनीष माहेश्वरी यांना ट्विटरने पदावरुन हटवले आहे. मनीष माहेश्वरी यांना नवीन जबाबदारी दिली असून त्यांना अमेरिकेत पाठवण्यात येणार आहे. 18 एप्रिल 2009 मध्ये नेटवर्क 18 या संस्थेतून ते ट्विटर इंडियात गेले होते.

Manish Maheshwari
मनीष माहेश्वरी
author img

By

Published : Aug 14, 2021, 8:32 AM IST

Updated : Aug 14, 2021, 8:40 AM IST

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशात ट्विटर चर्चेत आहे. सुरवातीला आयटी नियमांचे पालन करण्यावरून ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात वाद निर्माण झाला होता. तर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विटरखाते लॉक केल्यावरून काँग्रेस विरुद्ध ट्विटर असे चित्र निर्माण झाले आहे. या सर्व घटनाक्रमात ट्विटर इंडियाचे संचालक मनीष माहेश्वरी यांना ट्विटरने पदावरुन हटवले आहे. मनीष माहेश्वरी यांना नवीन जबाबदारी दिली असून त्यांना अमेरिकेत पाठवण्यात येणार आहे.

मनीष माहेश्वरी यांना पदावरून हटवलं असले, तरी ते ट्विटरमध्येच कार्यरत असणार आहेत. त्यांची बदली अमेरिकेत सीनियर डायरेक्टर, रिवेन्यू स्ट्रेटजी अॅन्ड ऑपरेशन या पदी करण्यात आली आहे. माहेश्वरी ट्विटरच्या सॅन फ्रान्सिस्को येथील कार्यालयात काम पाहतील. ही माहिती ट्विटरच्या प्रवक्त्याने दिली आहे. गेल्या अनेक वर्षापासून मनीष ट्विटरसाठी काम करत आहेत. 18 एप्रिल 2009 मध्ये नेटवर्क 18 या संस्थेतून ते ट्विटर इंडियात गेले होते. भारतातील सेल्स हेड कनिका मित्तल आणि बिझनेस हेड नेहा शर्मा कत्याल या दोघी जणी मनीष यांच्या जागी ट्विटर इंडियाचे नेतृत्व करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मनीष माहेश्वरी अडकले होते वादात -

उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या लोणीत वयोवृद्धाला मारहाण झालेल्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात मनीष माहेश्वरी वादात अडकले होते. लोणी सीमा पोलिसांनी मनीष माहेश्वरीला ट्विटरवर सांप्रदायिक व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल नोटीस बजावली होती. नोटीसमध्ये त्यांना प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले होते. मनीष यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने ही नोटीस रद्द केली होती. सोशल मीडियावर फिरत असलेला व्हिडिओ एका वृद्ध मुस्लिमावर हल्ला केल्याचा होता. हा व्हिडिओ व्हायरल होण्यापासून न रोखल्याप्रकरणी आणि समाजात जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी ट्विटरवर पोलिसांकडून एफआयआरही दाखल करण्यात आला होता.

भारत सरकार आणि ट्विटर यांच्यातील संघर्ष -

नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमांवरुन भारत सरकार आणि ट्विटर यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. नवीन आयटी कायद्यांचे पालन न करण्याबाबत ट्विटरच्या दृष्टिकोनावर सरकारने नाराजी व्यक्त केली होती. इंटरनेट मीडियाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्याने ट्विटरने आपली इंटरमीडियरी स्थिती गमावली होती. म्हणजेच ट्विटरने देशातील कायदेशीर संरक्षण गमावले. अर्थात, प्लॅटफॉर्मचा कुठल्याही गुन्हेगारी कृत्यासाठी वापर झाल्यास ट्विटरवर गुन्हा दाखल होणार आणि एकाद्या वादग्रस्त पोस्टप्रकरणी गुन्हा दाखल होण्याबरोबरच पोलीस चौकशीही होणार.

काँग्रेस आणि ट्विटर वाद -

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी 9 वर्षांच्या बलात्कार पीडित मुलीच्या आई-वडिलांसोबत झालेल्या भेटीचे छायाचित्र ट्विटर अकाऊंटवर शेअर केल्यामुळे त्यांचे खाते लॉक करण्यात आले आहे. तसेच ज्या काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींनी शेअर केलेला फोटो आपल्या खात्यावर पोस्ट केला. त्यांचेही खाते ट्विटरने लॉक केले. यामुळे काँग्रेस नेत्यांनी ट्विटरविरोधात मोर्चा उघडला. यानंतर काँग्रेसकडून #TwitterBJPseDarGaya, #IStandWithRahulGandhi आणि #UnlockRahulGandhi हे हॅशटॅग चालवण्यात आले.

ट्विटरचे स्पष्टीकरण -

काँग्रेस नेत्यांची खाती लॉत केल्या प्रकरणी ट्विटरकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. आम्ही नियम न्यायालयीन पद्धतीने आणि कोणताही पक्षपात न करता लागू करतो. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शेकडो ट्विटर खात्यांवर कारवाई करण्यात आली आहे. भविष्यातही आम्ही आमच्या नियमांनुसार कार्य करत राहू. काँग्रेस नेत्यांनी नियमांचे उल्लंघन करणारे चित्र पोस्ट केले होते. त्यामुळे कारवाई करण्यात आली. नागरिकांच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे, असे निवेदनात ट्विटरने म्हटलं आहे.

हेही वाचा - Twitter v/s Congress : ट्विटर खाते लॉक झाल्यावर राहुल गांधी म्हणाले...

हेही वाचा - गाझियाबाद मुस्लिम वृद्ध मारहाण प्रकरण: ट्विटर इंडियाचे MD मनीष माहेश्वरी यांना पाठवलेली नोटीस रद्द

हेही वाचा - 'कंपनीचे धोरण नाही, तर देशाचा कायदा मोठा', संसदीय समितीने ट्विटरला फटकारले

Last Updated : Aug 14, 2021, 8:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.