ETV Bharat / bharat

Twin Tower Demolished स्फोट झाला अन् काही क्षणातच पत्त्याप्रमाणे कोसळल्या ट्विन टॉवर्सच्या इमारती - Twin Tower Demolished

सुप्रीम कोर्टाने ट्विन टॉवर पाडण्याचे आदेश दिल्यानंतर अखेर आज रविवारी या दोन्ही इमारती Twin Tower Demolished पाडण्यात आल्या आहे. अवघ्या देशाचं लक्ष या इमारतींकडे लागले होते. अखेर या दोन्ही इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.

Twin Tower building Demolished
ट्विन टॉवर इमारत जमीनदोस्त
author img

By

Published : Aug 28, 2022, 2:42 PM IST

Updated : Aug 28, 2022, 3:53 PM IST

नोएडा, नवी दिल्ली सुप्रीम कोर्टाने ट्विन टॉवर पाडण्याचे आदेश दिल्यानंतर अखेर आज नोएडातील अनधिकृत अशा ट्विन टॉवर्सच्या दोन्ही इमारती Twin Tower Demolished पाडण्यात आल्या आहे. अवघ्या देशाचं लक्ष या इमारतींकडे लागले होते. अखेर या दोन्ही इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.

नोएडाच्या सेक्टर 93A मध्ये असलेले प्रसिद्ध सुपरटेक कंपनीचे ट्विन टॉवर्स आज पाडण्यात आले Twin Tower Demolished आहे. देशात प्रथमच एवढी उंच इमारत ३७०० किलो स्फोटकांचा वापर करून पाडण्यात आली Supertech Twin Towers Demolished Today आहे. सुपरटेक एमराल्ड हाऊसिंग सोसायटीच्या Supertech Emerald Housing Society अॅपेक्स आणि सायन या दोन टॉवर्सची उंची सुमारे १०१ आणि ९४ मीटर होती. तो पाडण्याची जबाबदारी एडफिस इंजिनीअरिंग कंपनीची होती. सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूटने यासाठी एनओसी दिली आणि त्याचा स्टेटस रिपोर्ट सादर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने बांधकाम पाडण्यास मान्यता दिली होती.

पाडण्यापूर्वी घेण्यात आली काळजी ट्विन टॉवर्सबाबत नोएडा प्राधिकरणाच्या निर्णयानुसार एमराल्ड कोर्ट ग्रुप हाऊसिंग आणि एटीएस व्हिलेजच्या फ्लॅटधारकांना सकाळी 7 वाजता त्यांचे संबंधित अपार्टमेंट रिकामे करावे लागले. एमराल्ड कोर्ट ग्रुप हाऊसिंग आणि एटीएस व्हिलेजचे सुरक्षा कर्मचारी दुपारी 12 वाजेपर्यंत या परिसराची देखरेख करण्यासाठी थांबले होते. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही दुपारी 12 नंतर दोन्ही परिसर रिकामे करण्यास सांगण्यात आले.

स्फोट झाला अन् काही क्षणातच पत्त्याप्रमाणे कोसळल्या ट्विन टॉवर्सच्या इमारती

वाहतूक वळवली उत्तरेला एमराल्ड कोर्टाच्या बाजूने बांधण्यात आलेला रस्ता, दक्षिणेला दिल्लीकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस वेचा सर्व्हिस रोड, पूर्वेला सृष्टी आणि एटीएस व्हिलेज दरम्यान बांधलेला रस्ता आणि उद्यानाला जोडलेला उड्डाणपूल यासाठी बहिष्कृत क्षेत्रे निश्चित करण्यात आली होती. नोएडा ग्रेटर, नोएडा एक्स्प्रेस वेवरील वाहतूक दुपारी 2.15 ते 2.45 पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. ट्विन टॉवर्ससमोरील उद्यानाच्या मागे बांधण्यात आलेल्या रस्त्यावर आपत्कालीन सेवेसाठी आवश्यक अग्निशमन दल, रुग्णवाहिका आदी उभ्या करण्यात आल्या होत्या.

३७०० किलो स्फोटकांचा झाला वापर ट्विन टॉवर्समध्ये 3700 किलो स्फोटके पेरण्यात आली होती. टॉवर सायन 29 मजली आणि एपेक्स 32 मजलीच्या सर्व मजल्यांवर स्फोटके पेरण्यात आली होती. पहिल्या दिवशी दोन्ही टॉवरच्या तीन मजल्यांमध्ये स्फोटके पेरण्यात आली होती. कंपनीने गेल्या २२ ऑगस्टपर्यंत स्फोटके बसवण्याचे काम पूर्ण केले होते.

परिसरात उडाली धूळच धूळ स्फोटानंतर एमराल्ड कोर्ट आणि एटीएस व्हिलेज परिसरात मोठ्या प्रमाणावर धूळ उडाली. धूळ जास्त उडू नये यासाठी 30 मीटर उंच लोखंडी पत्रा बसवण्यात आला होता. मात्र तरीही आकाशात उंचच उंच धूळ उडत होती. इमारतीमध्ये झालेल्या स्फोटादरम्यान जवळपासच्या सर्व रस्त्यांवर 30 मिनिटांसाठी वाहतूक रोखण्यात आली होती. सायंकाळपर्यंत नोएडातील आकाशात ही धूळ राहण्याची शक्यता आहे.

ट्विन टॉवर्सच्या इमारती पाडण्याचे कारण what is twin tower case 2006 मध्ये, नोएडा प्राधिकरणाने सेक्टर 93A मध्ये 17.29 एकर म्हणजेच सुमारे 70 हजार चौरस मीटर जमीन सुपरटेक बिल्डरला दिली होती. या सेक्टरमध्ये एमराल्ड कोर्ट ग्रुप हाउसिंग प्रकल्पांतर्गत 15 टॉवर बांधण्यात आले. प्रत्येक टॉवरमध्ये 11 मजली इमारत बांधण्यात आली. 2009 मध्ये, सुपरटेक बिल्डरने नोएडा प्राधिकरणाकडे एक सुधारित योजना सादर केली आणि त्याअंतर्गत, एपेक्स आणि सायन नावाच्या या ट्विन टॉवर्ससाठी एफएआर खरेदी केले. बिल्डरने दोन्ही टॉवरसाठी 24 मजल्यांचा आराखडा मंजूर करून 40 माजले बांधकाम करत 857 फ्लॅट बनवले. 600 फ्लॅटचे बुकिंग झाले. मात्र नंतर खरेदीदारांनी विरोध सुरू केला. टॉवर पाडण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने 11 एप्रिल 2014 रोजी दोन्ही टॉवर पाडण्याचे आदेश दिले. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. हे टॉवर पाडण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला दिल्ली एनसीआरची मोठी कंपनी असलेल्या सुपरटेक लिमिटेडने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयानेही आपली मोहर उमटवली होती. हे बेकायदा बांधकाम नोएडा प्राधिकरणाचे अधिकारी आणि सुपरटेक यांच्यातील संगनमताचा परिणाम आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीत म्हटले आहे.

हेही वाचा Supertech Twin Towers Demolished Video अवघ्या ९ सेकंदात ट्विन टॉवर्सच्या इमारती झाल्या जमीनदोस्त, पहा व्हिडीओ

Last Updated : Aug 28, 2022, 3:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.