जयपूर Triple Murder in Jaipur : राजस्थानची राजधानी जयपूरमधील कर्धनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणानं पत्नी आणि आणि आपल्या दोन मुलींची निर्घृण हत्या केलीय. आरोपींनी तिघांवर हातोड्यानं वार करुन तिघांचीही हत्या करत तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. यासोबतच पोलिसांनी आरोपीलाही अटक केली असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे. या तरुणानं कर्ज व कौटुंबिक वादातून हा गुन्हा केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. अमित कुमार उर्फ करण यादव असं या तरुणीचं नाव आहे.
दिवसभर लहान मुलीला घेऊन फिरला : कर्धानी पोलीस ठाण्याचे अधिकारी उदय सिंग यांनी सांगितलं की, ही घटना कर्धानीच्या सरना डुंगर भागात घडलीय. अमित कुमार उर्फ करण यादव हा पत्नी आणि दोन मुलींसह भाड्याच्या घरात राहात होता. तो मूळचा फतेहपूर, उत्तर प्रदेशचा रहिवासी असून जयपूरमध्ये अगरबत्ती बनवण्याचं काम करतो. 17 नोव्हेंबरच्या रात्री त्यानं पत्नी किरण आणि मोठ्या मुलीची हत्या करुन मृतदेह एका खोलीत ठेवला. यानंतर तो दिवसभर लहान मुलीसह घराबाहेर फिरत राहिला. रात्री घरी आल्यानंतर तो लहान मुलीसोबत दुसऱ्या खोलीत झोपला आणि रविवारी पहाटे त्यानं लहान मुलीचीही हत्या करून तिचा मृतदेह तिथंच टाकून पळ काढला.
प्रेमविवाह केला, नंतर कर्जामुळं त्रस्त : हत्या केल्यानंतर आरोपी घाईघाईनं घराबाहेर पडला. त्याच्या घराला कुलूप पाहिलं असता शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रेस करुन आरोपीला कनकपुरा रेल्वे स्थानकावरुन अटक केलीय. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीचा किरणसोबत प्रेमविवाह झाल्याचं समोर आलंय. तो जयपूरमध्ये अगरबत्ती बनवायचा. त्याच्यावर दीड ते दोन लाख रुपयांचं कर्ज होतं. याशिवाय काही कौटुंबिक कारणावरुनही त्याचा पत्नीसोबत वादही होत होता.
पत्नी रुग्णालयात असल्याची शेजाऱ्यांना बतावणी : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि त्याचं कुटुंब एका घरात तीन खोल्यांमध्ये राहत होतं. तर त्याच घरात इतर लोकही भाड्यानं राहात होते. शनिवारी किरण आणि तिची मोठी मुलगी कधी दिसली नाही, असं शेजाऱ्यांनी विचारलं असता, पत्नीची तब्येत खराब असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी तो खोल्यांना कुलूप लावून पळून गेला. त्यामुळं शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले. मृतदेह कानवटिया रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. या घटनेची माहिती पोलिसांनी किरणच्या कुटुंबीयांना दिलीय. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे.
हेही वाचा :