ETV Bharat / bharat

व्यासपीठावर चर्चा करण्याचे अभिषेक बॅनर्जींचे मोदींना आव्हान

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच अभिषेक बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चर्चेसाठी आव्हान दिले.

अभिषेक बॅनर्जी
अभिषेक बॅनर्जी
author img

By

Published : Mar 21, 2021, 6:21 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामधील चुरस वाढत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच अभिषेक बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चर्चेसाठी आव्हान दिले. पंतप्रधान मोदींनी शनिवारी बंगालमधील निवडणूक सभेत प्रचारादरम्यान टीएमसीवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. यावर अभिषेक बॅनर्जी यांनी पलटवार केला. गेल्या 10 वर्षातील दीदींची कामगिरी आणि भाजपा सरकारच्या 7 वर्षाच्या कामगिरीवर चर्चा करण्याचे आव्हान त्यांनी मोदींना दिले.

माझे वय 33 वर्ष आहे. मी वरिष्ठांचा आदर करतो. तुम्ही कागदाशिवाय दोन मिनिटे बंगाली भाषेत बोलून दाखवावे. मी 2 तास हिंदीमध्ये बोलेल, असेही अभिषेक बॅनर्जी म्हणाले.

भाजपाच्या विकासाची व्याख्या वेगळी -

तृणमूल काँग्रेसच्या 'खेला होबे' या घोषणेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'विकास होबे' असे प्रत्युत्तर दिले होते. यावरही अभिषेक यांनी भाष्य केले. पंतप्रधान 'विकास होबे' (विकास असणे आवश्यक आहे), असे म्हणत आहेत. मात्र, भाजपाच्या विकासाची व्याख्या वेगळी आहे. भाजपाच्या विकासामुळे शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. पीएम मोदी यांनी 2014 मध्ये 15 लाख रुपयांचे आश्वासन दिले होते. तसेच नोटाबंदीच्या वेळी त्यांनी 50 दिवस मागितले होते. कोणतेच आश्वासन त्यांनी ते त्यांच्या वक्तव्यावर कायम राहत नाहीत, असे अभिषेक बॅनर्जी म्हणाले.

मोदींवर हल्लाबोल -

पंतप्रधानांच्या 'सोनार बांगला' (सुवर्ण राज्य) या अभिवचनाचा उल्लेख केला. भाजपा सोनार इंडिया का बनवू शकला नाही? सोनार त्रिपुरा नाही?असा सवाल त्यांनी केला. ज्या राज्यात भाजपा सत्तेत आहे. तिथे विकास नाही, असे बॅनर्जी म्हणाले. तसेच ममता बॅनर्जी यांनी दहा वर्षांचे रिपोर्ट कार्ड दिले आहे. मात्र, मोदींचे रिपोर्ट कार्ड कुठे आहे, असाही सवाल त्यांनी केला.

हेही वाचा - तृणमूल काँग्रेसचे खासदार भाजपा मंचावर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.