ETV Bharat / bharat

Tributes Paid To ITBP Personnel बस दुर्घटनेत शहीद झालेल्या जवानांना जम्मू काश्मीर उपराज्यपालांनी दिला भावपूर्ण निरोप

author img

By

Published : Aug 17, 2022, 2:57 PM IST

उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी डीपीएल श्रीनगर येथे पहलगाम येथील बस अपघातात मरण पावलेल्या ITBP जवानांना श्रद्धांजली Tributes Paid To ITBP Personnel वाहिली. बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस नदीत पडून ही दुर्घटना घडली होती. यात सात जवान शहीद झाले होते. ITBP Personnel Died In Pahalgam Incident

Tributes Paid To ITBP Personnel
Tributes Paid To ITBP Personnel

जम्मू काश्मीर जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी बस अपघातात 7 इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) जवान शहीद झाले होते. बुधवारी जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि आयटीबीपीचे डीजी डॉ. सुजॉय लाल धोसने श्रद्धांजली Tributes Paid To ITBP Personnel वाहण्याकरीता उपस्थित होते. ITBP ने दिलेल्या माहितीनुसार, बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 7 जवानांचे मृतदेह श्रीनगरला आणण्यात आले. ITBP Personnel Died In Pahalgam Incident जेथे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि ITBP DG डॉ. सुजॉय लाल थोसेन यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांना पुष्पहार अर्पण केला. श्रद्धांजली कार्यक्रमानंतर मनोज सिन्हा यांनीही जवानांच्या मृतदेहाला खांदा लावून त्यांना अखेरचा निरोप दिला.

बसचे ब्रेक निकामी झाल्याने ती नदीत पडली. बसमध्ये ITBP चे 37 जवान आणि 2 जम्मू-काश्मीर पोलिस कर्मचारी होते. अखेरचा निरोप देताना, लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी स्वतः जवानांचे पार्थिव रुग्णवाहिकेत ठेवले. तेथून या जवानांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. सर्व पाहुण्यांनी शहीद जवानांचे कार्य व बलिदान सदैव स्मरणात राहील असे सांगितले. मंगळवारी सकाळी जम्मू-काश्मीरमधील चंदनवाडी येथून पहलगामच्या दिशेने जाणारी सैनिकांची बस नदीत कोसळली. या अपघातात ITBP चे 7 जवान शहीद झाले तर 30 जवानांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आयटीबीपीनेही अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा - Vidhan Bhavan शिंदे फडणवीस सरकार विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.