ETV Bharat / bharat

Transparent Face Mask - आता भारतातही मिळणार पारदर्शक मास्क, 'इतकी' आहे किंमत - CeeMee Mask

कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे व मास्क हे गरजेचे आहे. कोरोना काळापासून मास्कचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बाजार विविध प्रकारचे रंगबेरंगी मास्क उपलब्ध आहेत. आता भारतीय बाजारात पारदर्शक मास्क ( Transparent Face Mask ) उपलब्ध झाले असून यातून मास्कमागे कोणती व्यक्ती आहे, हे ओळखने सोपे होणार आहे.

फोटो सौजन्य एएनआय
फोटो सौजन्य एएनआय
author img

By

Published : Mar 16, 2022, 5:05 PM IST

मुंबई - कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे व मास्क हे गरजेचे आहे. कोरोना काळापासून मास्कचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बाजार विविध प्रकारचे रंगबेरंगी मास्क उपलब्ध आहेत. आता भारतीय बाजारात पारदर्शी मास्क उपलब्ध झाले आहे. मात्र, यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होणे, मोबाईल फेस अनलॉक करणे, चेहऱ्यावरील मेकअप खराब होणे, अशा विविध अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्याचबरोबर जे मुक बधिर आहेत, त्यांना मास्कमुळे समोरच्या व्यक्तीच्या म्हणणे त्यांच्या ओठाच्या हलचाली पाहू शकत नाही. या सर्व अडचणींवर उपाय म्हणून की मी या कंपनीने पारदर्शक मास्क ( Transparent Face Mask ) आता भारतीय बाजार उपलब्ध झाले आहे.

हे मास्क भारतातील एका शॉपिंग साइट व अॅपवर 2 हजार 990 रुपयांत उपलब्ध आहे. हे पारदर्शक ( Transparent Face Mask ) असून सुरक्षित मास्क आहे. स्वच्छ हवा व ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी मास्कच्या खालच्या बाजूला N98+ ही फिल्टरयुक्त जाळी लावण्यात आली आहे. दूषित हवा दूर ठेवण्यासाठी नॉन अॅब्रेसिव्ह बेबी सॉफ्ट लिक्विड सिलिकॉन रबरचे सील या मास्कच्या आसपास लावण्यात आलेले आहेत. उच्च प्रतिचा कच्चा माल वापरल्याने ते मास्क दररोज स्वच्छ करुन आपण वापरू शकतो.

उद्योजक अनुराग गुप्ता आणि डिझायनर दीपक पठानिया म्हणाले, दोन वर्षांनंतर, जगभरातील लोक कोरोना सारख्या महामारीचा सामना करत आहेत. सर्जिकल मास्कच्या मागे चेहरा लपवून नागरिक कंटाळले आहेत. मास्कच्यामागे हसण्याचा अर्थ गमावला आहे, काय बोलले जात आहे ते समजणे कठीण आहे. मास्कच्या मागे लिप-रिडिंग शक्य नाही. तसेच महिलांनी लिपस्टिक लावणे आणि मेकअप करणे बंद केले आहे, बहुतेक लोकांनी त्यांचे मोबाईल अनलॉक करण्यासाठी पिन वापरावे लागत आहे. कारण फेस आयडी मास्कसह कार्य करत नाही.

कीमीची रचना आणि या सर्वांचा सामना करण्यासाठी केली गेली आहे. तर प्रत्यक्षात हा मुखवटा अधिक सुरक्षित आणि परिधान करण्यास अधिक आरामदायक बनवला आहे. सर्जिकल मास्कच्या तुलनेत हे नक्कीच खूप महाग आहे, परंतु हे जवळजवळ अदृश्य उत्पादन बनवण्यामध्ये किती तंत्रज्ञान, औद्योगिक कौशल्ये आणि साहित्य विज्ञान हे तुम्हाला समजते तेव्हा ते महाग वाटणार नाही. भारताव्यतिरिक्त जपान, दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये हे मास्क विकण्यावर आमचा भर असल्याचे गुपा व पठानिया यांनी सांगितले.

हेही वाचा - PF Interest Rate : केंद्राने ठरवला गेल्या चाळीस वर्षातील सर्वात निचांकी पीएफ व्याजदर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.