ETV Bharat / bharat

Theft of Transformers: गजब...! सोन-चांदी नाही, ट्रान्सफॉर्मरचीचं केली चोरी; अनेक गावं अंधारात

आजपर्यंत तुम्ही दागिने, पैसे त्यासारख्या इतर मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याबद्दल ऐकले असेल. पण बिहारच्या सिवान जिल्ह्यात चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरची चोरी केली आहे. तेही एक नाही तर पाच ट्रान्सफॉर्मरची. सिवान जिल्ह्यातील रघुनाथपूरमध्ये पाच ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्याने अनेक गावे अंधारात बुडाली आहेत.

ट्रान्सफॉर्मरचीचं केली चोरी
ट्रान्सफॉर्मरचीचं केली चोरी
author img

By

Published : Dec 12, 2022, 9:53 PM IST

सिवान (बिहार) - सिवान जिल्ह्यातील रघुनाथपूर पोलीस स्टेशन परिसरात ट्रान्सफॉर्मर चोरीची ही घटना समोर आली आहे. रघुनाथपूर येथील पाच गावांतील ट्रान्सफॉर्मरवर चोरट्यांनी हात साफ केल्याने पाचही गावे अंधारात बुडाली आहेत. रघुनाथपूर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 12 आणि 14 मध्ये रविवारी रात्री ट्रान्सफॉर्मर चोरीची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवार आज (दि. 12 डिसेंबर)रोजी सकाळी लोकांना जाग आली तेव्हा लोकांना ही घटना समजली.

गावातील वीज व्यवस्था विस्कळीत - पाचही गावात १६ केव्हीएचे ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटनेनंतर गावातील वीज व्यवस्था विस्कळीत झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरट्यांना गावाला अंधारात ठेवून चोरी करायची होती असा अंदाज गावकऱ्यांनी वर्तवला आहे.

ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्याने अडचण - ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी वीज विभागाला दिली आहे. त्यानंतर रघुनतपूर बाजा, पंजवार, कृषी फार्म, आमवारी आणि मुरारपट्टी गावातून पाच ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्याची माहिती विद्युत विभागाचे जेई अमित मौर्य यांनी पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान, पोलिस ठाण्याचे अध्यक्ष तनवीर आलम यांनी सांगितले की, "तोंडी माहिती मिळाली आहे. गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.