ETV Bharat / bharat

गोव्यातील २३ न्यायाधीशांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या, मुंबई उच्च न्यायालयाकडून आदेश जारी - न्यायदंडाधिकारी

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गोव्यातील प्रधान सत्र व जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश निघाले आहेत. यामध्ये प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसह 23 न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

उच्च न्यायालय गोवा
उच्च न्यायालय गोवा
author img

By

Published : May 28, 2021, 7:52 PM IST

गोवा (पणजी) - मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गोव्यातील प्रधान, सत्र व जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश निघाले आहेत. यामध्ये प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसह 23 न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार एस. सी. डिंगे यांनी हे आदेश जारी केले आहेत.

प्रधान, सत्र व जिल्हा न्यायाधीश ते प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या बदल्या

पणजीचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांची मडगाव येथे, तर, प्रधान न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांची पणजीत बदली झाली आहे. पणजीचे अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायाधीश शेरीन पॉल यांची म्हापसा येथे बदली झाली आहे. तर, पॉल यांच्या जागी एडगर फर्नांडिस आणि म्हापशातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांची बदली झाली आहे. तसेच, न्यायाधीश बेला नाईक यांची पणजी येथे बदली करण्यात आली आहे. औद्योगिक व कामगार लवादाचे अध्यक्ष व न्यायाधीश विन्सेंट डिसिल्वा यांची बदली मडगाव जिल्हा व सत्र न्यायालयात झाली आहे. तर, म्हापसा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश दुर्गा मडकईकर यांची मडगाव येथे बदली झाली आहे.

न्यायाधीशांच्या बदल्या व नेमणूका

मडगाव येथील मुख्य न्यायदंडाधिकारी राम प्रभूदेसाई याची पणजी येथे बदली. तर, त्यांच्या जागी न्यायाधीश अपूर्वा नागवेकर यांची बदली. मडगाव येथील प्रथमश्रेणी न्यायाधीश साई प्रभुदेसाई यांची फोंडा येथे, तर त्यांच्या जागी असलेले न्यायदंडाधिकारी अनिल स्कारिया यांची बदली पणजी येथे झाली आहे. न्यायदंडाधिकारी आर. फर्नांडिस यांना त्यांच्या मूळ जागी मडगाव येथे पाठविण्यात आले आहे. तर, न्यायदंडाधिकारी शुभदा दळवी यांना त्यांच्या मूळ जागी वास्को येथे पाठवण्यात आले आहे. पणजीच्या मुख्य न्यायदंडाधिकारी आरतीकुमारी नाईक यांची पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बदली झाली आहे. म्हापसा प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी श्री. शेणाई कुडचडकर यांची मडगाव येथे बदली झाली. तर, त्यांच्या जागी न्यादंडाधिकारी निलिमा काणकोणकर, न्यायदंडाधिकारी अक्षता काळे यांची डिचोली येथे बदली झाली आहे. तर, न्यायदंडाधिकारी गिरीजा गावकर यांची बदली केपे येथे झाली आहे. न्यायदंडाधिकारी ज्यूड सिक्वेरा यांची वाळपई येथे, तर, न्यायदंडाधिकारी मनिषा शैलेश नार्वेकर यांची मडगाव येथे बदली करण्यात आली आहे. न्यायदंडाधिकारी सबिना ब्रागांझा यांची पणजी येथे बदली झाली. तर, न्यायदंडाधिकारी सुमन गाड यांची पेडणे येथे बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा - 'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट - एसटीच्या १३०० सुरक्षा रक्षकांना मिळणार थकीत वेतन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.