ETV Bharat / bharat

Train Engine Run Without Driver : काय सांगता! ड्रायव्हरशिवाय 2 किलोमीटर धावले रेल्वेचे इंजिन, पाहा व्हिडिओ - Train Engine Without Driver

राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात लोको पायलटशिवाय रेल्वेचे इंजिन धावत राहिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुसऱ्या लोको पायलटने चालत्या इंजिनमध्ये चढून ते थांबवले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Train Engine Run Without Driver
ड्रायव्हरशिवाय रेल्वेचे इंजिन धावले
author img

By

Published : Jul 24, 2023, 5:00 PM IST

पहा व्हिडिओ

श्रीगंगानगर (राजस्थान) : राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात रविवारी एक धक्कादायक घटना घडली. येथे एक रेल्वेचे इंजिन, लोको पायलटशिवाय चक्क 2 किलोमीटर धावत होते. या घटनेमुळे रेल्वे प्रशासन हादरले आहे. सुदैवाने त्यावेळी रेल्वे ट्रॅक रिकामा असल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर आता प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात येत आहे. हे प्रकरण सुरतगडच्या सबक्रिटिकल थर्मल पॉवर प्लांटशी संबंधित आहे.

दुसऱ्या लोको पायलटने चालते इंजिन थांबवले : या प्रकरणी कर्मचारी संघटना इंटकचे नेते श्याम सुंदर शर्मा म्हणाले की, हे इंजिन टिपलर क्रमांक तीन वॅगनमधून रिकामा कोळसा रेक घेण्यासाठी आले होते. ट्रेनचे इंजिन ड्रायव्हरशिवाय सुमारे 2 किलोमीटर धावत होते. एवढेच नाही, तर हे इंजिन सब क्रिटिकलवरून सुपर क्रिटिकल युनिटपर्यंत पोहोचले होते. शेवटी सुपरक्रिटिकल युनिटमध्ये तैनात असलेल्या एका लोको पायलटने चालत्या इंजिनमध्ये चढून ते थांबवले. त्यावेळी रेल्वे ट्रॅक रिकामा होता ही सुदैवाची बाब होती, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा : श्याम सुंदर शर्मा म्हणाले की, लोको पायलटने इंजिन सुरू असतानाच ते सोडले, त्यामुळे इंजिन पुढे जाऊ लागले. लोको पायलट आणि इतर कर्मचारी परत आल्यावर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र तोपर्यंत इंजिन दोन किलोमीटर दूर गेले होते. या प्रकरणात कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाची बाब उघडकीस आली आहे.

कंत्राटदार कंपनीवर कारवाईची मागणी : या प्रकरणी कर्मचारी संघटना इंटकचे नेते श्याम सुंदर शर्मा यांनी कंत्राटदार कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ट्रॅकवर दुसरा रेक आला असता किंवा इंजिन पुढे गेले असते तर मोठी दुर्घटना घडली असती, असे त्यांनी सांगितले. सध्या थर्मल प्रशासनाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

हेही वाचा :

  1. Passengers Jump Into River : ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा, प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी चक्क नदीत उड्या मारल्या; Watch Video
  2. One Crore Compensation : या दुचाकी चालकाला भरपाई म्हणून मिळाले तब्बल 1.58 कोटी!
  3. Vande Bharat : वंदे भारत ट्रेनमध्ये मूत्र विसर्जनासाठी जाणे आले अंगलट; प्रवाशाला बसला 6 हजाराचा भुर्दंड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.