ETV Bharat / bharat

train accident in West Bengal : दोन मालगाडींची धडक झाल्याने १२ डबे रुळावरून घसरले.. बंगालमध्ये टळली बालासोराची पुनरावृत्ती! - बांकुरा रेल्वे अपघात

पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. दोन मालगाड्यांची टक्कर झाल्याने मालगाडीचे १२ डबे रुळावरून घसरल्याने खळबळ उडाली आहे. रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. रेल्वेचे वाहतूक सुरळित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

train accident in West Bengal
पश्चिम बंगालमध्ये रेल्वे अपघात
author img

By

Published : Jun 25, 2023, 9:17 AM IST

Updated : Jun 25, 2023, 9:30 AM IST

कोलकाता : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघाताची पश्चिम बंगालमध्ये पुनरावृत्ती थोडक्यात टळली आहे. पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे रविवारी पहाटे ४ वाजता रेल्वे अपघात झाला आहे. बांकुरा येथे दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. ही धडक इतकी जोरदार होती की मालगाडीचे 12 डबे थेट रुळावरून घसरले.

ओंडा स्थानकावरून मालगाडी जात असताना मागून दुसरी मालगाडी अचानक धडकली, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या अपघातात मालगाडीचे सुमारे 12 डबे रुळावरून घसरल्याने भीषण अपघात. या अपघातात मालगाडीचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. मालगाडीच्या धडकेचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. या रेल्वे अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

  • #WATCH | West Bengal: Two goods trains collided at Onda railway station in Bankura. Rail operation on Kharagpur–Bankura–Adra line has been halted. More details awaited. pic.twitter.com/T4sL5rn7Rp

    — ANI (@ANI) June 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अपघाताबाबात चौकशी सुरू- रेल्वे अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मालगाड्या रिकाम्या असल्याने अपघातात जीवितहानी नाही. मात्र अपघाताचे कारण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना समजू शकलेले नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या घटनेची कसून चौकशी करत आहेत. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातानंतर आद्रा विभागातील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अप मार्गातील रेल्वे वाहतूक सुरळित करण्याचा रेल्वे अधिकारी प्रयत्न करत आहेत. अपघातामध्ये प्रवासी रेल्वे असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. दोन्ही रिकाम्या मालगाडी असल्याने जीवितहानी टळू शकली आहे.

बालासोर अपघाताचे अद्यापही गुढ: 2 जूनला ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्थानकावर बंगळुरू - हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, कोरोमंडल एक्स्प्रेस आणि एक मालगाडी यांची धडक झाली होती. या अपघातात 288 जणांचा मृत्यू झाला. सीबीआयच्या 10 सदस्यीय पथकांनी बालासोर येथील रेल्वे अपघातस्थळी पाहणी केली आहे. हे पथक 2 जून रोजी झालेल्या अपघाताची चौकशी करत आहे. अद्याप 110 मृतदेहांची ओळख पटलेली नसल्याने रेल्वे विभागासमोर आव्हान आहे. 'इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल' झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संशय व्यक्त केला आहे.

हेही वाचा-

  1. Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघात, सीबीआयने दाखल केला एफआयआर
  2. Odisha Goods Train Derailed : सोसाट्याच्या वाऱ्याने ओडिशात मालगाडी घसरली रुळावरून, 6 मजुरांचा मृत्यू

Last Updated : Jun 25, 2023, 9:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.