ETV Bharat / bharat

Crime News : अपघातात मुलाचा मृत्यू; जमावाने केली ट्रॅक्टर चालकाची हत्या - झारखंडमध्ये मॉब लिंचिंग

झारखंडमध्ये जमावाच्या हल्ल्यात (Mob Lynching in Jharkhand) एका 15 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. सध्या तरी या तरुणाची हत्या कोणी केली याचा शोध लागू शकलेला नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. ट्रॅक्टरखाली येऊन एका मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जमाव आक्रमक झाला होता.

mob lynching in Jharkhand
झारखंडमध्ये मॉब लिंचिंग
author img

By

Published : Jul 29, 2023, 9:38 PM IST

लोहरदगा (झारखंड) : झारखंडच्या लोहरदगा येथे एका 15 वर्षीय तरुणाचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथे ट्रॅक्टरखाली येऊन एका मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर काही लोकांनी ट्रॅक्टर चालवणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण केली. पोलिसांनी मात्र मॉब लिंचिंगच्या शक्यतेला नाकारले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

तरुणाचा मारहाणीत मृत्यू : झाले असे की, झारखंडच्या लोहरदगा जिल्ह्यातील आरेया गावात ट्रॅक्टरखाली येऊन एका 5 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. यानंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी ट्रॅक्टर चालवणाऱ्या 15 वर्षीय तरुणाला मारहाण केली. यामध्ये या तरुणाचा मृत्यू झाला. पोलीस मात्र या प्रकरणी मॉब लिंचिंगची बाब नाकारत आहेत. असे असले तरी पोलिसांनी घटनेचा प्रत्येक अंगाने तपास सुरू केला आहे.

5 वर्षीय बालकाचा ट्रॅक्टरखाली येऊन मृत्यू : आरेया गावातील रहिवासी विशाल प्रजापती (वय 15 वर्षे) हा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतात ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी करत होता. त्यावेळी श्रेयांश साहू (वय 5 वर्षे) हा मुलगा त्याच्या ट्रॅक्टरमध्ये बसला होता. दरम्यान, ट्रॅक्टर चालवत असताना श्रेयांश अचानक ट्रॅक्टरमधून खाली पडला आणि रोटाव्हेटरमध्ये अडकला. यामध्ये त्याचा वेदनादायक मृत्यू झाला.

हत्या कोणी केली, अद्याप अस्पष्ट : ही घटना समजल्यानंतर गावातील लोकांनी विशालला बेदम मारहाण करून त्याला ट्रॅक्टरच्या टायरखाली फेकून दिले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. विशालची हत्या कोणी केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत विशालचा मृत्यू झाल्याची लोकांमध्ये चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी लोहरदगा सदर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात : पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. पोलीस दोन्ही बाजूंचे जबाब घेत आहेत. गावातील परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा :

  1. MP Rape Case : मंदिरातील कर्मचाऱ्यांचे राक्षसी कृत्य!, बलात्कार केला आणि प्रायव्हेट पार्टमध्ये...
  2. Police Firing In Bihar : बिहारमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट, पोलिसांच्या गोळीबारात तिघांचा मृत्यू
  3. Crime News : धक्कादायक! अवघ्या 100 रुपयांसाठी बापाने पोराचा गळा चिरला!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.