ETV Bharat / bharat

Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या...

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10 @  1 PM
Top 10 @ 1 PM
author img

By

Published : Jun 28, 2021, 6:39 AM IST

Updated : Jun 28, 2021, 1:08 PM IST

मुंबई - ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न हे भाजपाचे पाप असून फडणवीस आणि फसवणूक हे समानार्थी शब्द असल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. तसेच ओबीसी समाजाला चार महिन्यात आरक्षण देईन, अन्यथा राजकारणाचा संन्यास घेईन, अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा करणारे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? असा सवालही देवेंद्र फडणवीसांना विचारला आहे. सविस्तर वाचा..

नांदेड - सत्तेत आल्यानंतर चार महिन्यांत ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणाचा प्रश्न सोडवू, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर जयंत पाटील यांनी नांदेडमध्ये प्रत्युत्तर दिले. ओबीसींचा कळवळा असेल तर प्रश्न कसा सोडवाल, ते सांगा, आम्ही सोडवू, त्यासाठी तुम्ही सत्तेत येण्याची गरज नाही. कारण जनतेने तुम्हाला नाकारले आहे, असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीस यांना लगावला. ते नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या परिसंवाद यात्रेदरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सविस्तर वाचा..

नाशिक - इगतपुरीमध्ये पोलिसांनी रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील दोन बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याची गुप्त माहितीवरून नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी छापा टाकत तब्बल 22 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये काही महिला फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या तर 1 महिला बिग बॉस या शोमध्ये काम केलेली असल्याचे समजते. सविस्तर वाचा..

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासली होती. आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी मुंबई महापालिकेने ‘ऑक्सिजन बॉटलिंग प्लांट’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लांटमधील ऑक्सिजनच्या पुरवठ्यामुळे विविध रुग्णालयांना ऑक्सिजनची गरज भासल्यास विनाअडथळा ऑक्सिजनचा पुरवठा करणे सुलभ होणार आहे. त्यासाठी पालिका २१ कोटी रुपये खर्च करणार आहे. सविस्तर वाचा..

मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार कमी होत असला तरी तो पूर्णपणे गेलेला नाही. तसेच राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याबाबत राज्य सरकारने नवीन परिपत्रक काढले आहे. त्यानुसार मुंबईतही सोमवारपासून (दि. २८ जून) तिसऱ्या स्थराचे निर्बंध लागू राहतील, असे परिपत्रक पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी काढले आहे. यामुळे दुकाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार असून ५ वाजल्यानंतर संचारबंदी लागू असणार आहे. दरम्यान, हे निर्बंध अधिक कडक केले जाऊ शकतात, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सविस्तर वाचा..

मुंबई - इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या वार्षिक निकालाच्या कामासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शाळेत बोलवण्यात आले आहे. तसेच, आदेशसुद्धा शालेय शिक्षण विभागाने काढले आहे. मात्र, रेल्वे प्रवासाची अनुमती अद्याप न मिळाल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संतापले आहेत. आपला हा संताप व्यक्त करण्यासाठी शिक्षकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ५१ प्रश्नांचे पत्रच पाठवले आहे. सविस्तर वाचा..

भंडारा - कोरोना नियमांची पायमल्ली करत मोठ्या संख्येने लोकांना बोलावून लग्न सोहळा साजरा करने एका आयोजकाला चांगलेच महागात पडले. या आयोजकावर भंडारा तहसीलदार अक्षय पोयाम यांनी 10 हजार रुपयांचा दंड ठोठावत तो वसूलही केला आहे. भंडारा शहरालगत ठाणा गावातील बावनकुळे सभागृहात हा प्रकार घडला. सविस्तर वाचा..

नवी दिल्ली - 'कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट हा डेल्टाच्या तुलनेत जास्त वेगाने पसरतो, असा आतापर्यंत कोणताही अहवाल पुढे आलेला नाही. तरीही डेल्टा व्हेरिएंटला गांभीर्याने घेतले पाहिजे', असे भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेचे (आयसीएमआर) माजी मुख्य वैज्ञानिक डॉ. रमन आर. गंगाखेडकर यांनी शनिवारी (26 जून) म्हटले. सविस्तर वाचा..

नवी दिल्ली - भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी हे त्यांच्या रोकठोक मतांसाठी ओळखले जातात. अनेकदा स्वामींची भूमिका ही पक्षाच्या भूमिकेपेक्षा बरीच वेगळी असली तरी ते उघडपणे आपली मतं मांडताना दिसतात. जम्मू काश्मीर, 2024 लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक, आदी मुद्यांवर ईटीव्ही भारतच्या ज्येष्ठ वार्ताहर अनामिका रत्न यांनी सुब्रमण्यम स्वामी यांच्याशी चर्चा केली आहे. सविस्तर वाचा..

सविस्तर बातम्यांसाठी येथे क्लिक करा...

Last Updated : Jun 28, 2021, 1:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.