नंदुरबार - दुर्गम भागात रुग्णांसाठी आतापर्यंत बांबू अॅम्बुलन्सचा वापर केला जात होता. त्यामुळे, अनेकांना दवाखान्यापर्यंत पोहचण्यास उशीर झाल्यामुळे अनेकांनी जीव देखील गमावला आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाच्या वतीने ग्रामीण भागांतील रुग्णांना सेवा देण्यासाठी बाईक अॅम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली. 23 दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते बाईक ॲम्बुलन्सचे लोकार्पणही झाले, मात्र ते अद्यापही धुळखात पडून आहेत. सविस्तर वाचा..
सातारा - जगभराला कोरोनाची झळ बसली असताना जिल्ह्यातील 27 गावांनी दोन्ही लाटांमध्ये या साथरोगाला हद्दी बाहेर रोखण्यात यश मिळाले. महाबळेश्वर, सातारा, पाटण, वाई व जावळी तालुक्यातील ही गावे आहेत. या गावांमध्ये कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अद्यापपर्यंत एकही बाधित आढळून आला नाही. यातील सायळी (ता. सातारा) या गावाने आदर्श प्रणालीचा अवलंब करत कोरोनाला ग्रामस्थांपासून दोन हात दूर ठेवले. सविस्तर वाचा..
पुणे - ओबीसी समाजाचे न्याय आणि हक्क याबाबत समाजातीलच अनेक नेत्यांची वेगवेगळी मतमतांतरे होती. त्यावरून वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते. त्यावर चर्चा करण्यासाठी आज पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या पदाधिकाऱ्यांची मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसी समाजाच्या पुढील वाटचालीवर चर्चा झाली असून बैठकीनंतर येत्या 26 आणि 27 जून रोजी लोणावळा येथे ओबीसी समाजातील पुढील वाटचालीवर चर्चा करण्यासाठी शिबीर घेण्याचे ठरले आहे. सविस्तर वाचा..
सातारा - जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 856 नविन कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर 16 बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठवले यांनी दिली. काल तालुक्यात सर्वाधिक 174 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. जिल्ह्यामध्ये 10 हजार 708 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत, तर 738 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रीपदासाठी आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा असतील. पण महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष टिकलं तर मुख्यमंत्रीपदासाठी 'वाटा' की 'घाटा' असा प्रश्न निर्माण होईल. कारण, आताच राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपला मुख्यमंत्री व्हावा म्हणून तयारीला लागले आहेत. मुख्यमंत्रीपदाची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सुप्त भावना आणि नाना पटोले यांची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यामुळे ५ वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील, या संजय राऊतांच्या वक्तव्यात आत्मविश्वासाची कमतरता दिसून येत असल्याचा पलटवार विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला एक आज वर्ष पूर्ण होत आहे. अद्यापही सुशांत सिंहने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. १३ जून २०२० ते आजतागत या प्रकरणात विविध खुलासे, चौकशी आणि प्रकरणे बाहेर आली. मात्र आजही या प्रकरणाचा निकाल लावण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. सविस्तर वाचा..
वाशिम - जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे, मात्र सोयाबीन बियाणे आणि डीएपी खतांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खते, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन टंचाई दूर करून बियाणे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. सविस्तर वाचा..
भोपाळ : मध्य प्रदेशच्या राजधानीमध्ये हिंदू संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी भाजप नेत्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप नेते निलेश हिंगोरानी यांना मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वर्चस्ववादातून ही मारहाण करण्यात आल्याचे बोलले जात आहे. यावेळी निलेश यांना बॅट आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, याप्रकरणी तपास सुरू आहे. दरम्यान भाजपा नेत्याने दिलेल्या जवाबानुसार, दारुच्या पैशांसाठी ही मारहाण करण्यात आली. हे कार्यकर्ते त्यांना एक लाख रुपये मागत होते, असेही निलेश यांनी सांगितले. सविस्तर वाचा..
भुवनेश्वर : सध्या 'प्राईड मंथ' सुरू असतानाच, ओडिशा सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य पोलीस खात्यामध्ये आता कॉन्स्टेबल आणि उपनिरीक्षक पदासाठी ट्रान्सजेंडर व्यक्तींनाही अर्ज दाखल करता येणार आहे. पोलीस खात्याने यासंबंधी सूचना जारी केली असून, या पदांसाठी पात्र ट्रान्सजेंडर व्यक्तींनी अर्ज दाखल करावेत असे आवाहन केले आहे. सविस्तर वाचा..
पॅरिस - रोलँड गॅरोस येथे झालेल्या फ्रेंच ओपन 2021 पुरुष एकेरी अंतिम सामन्यात नोवाक जोकोव्हिचने स्टेफानोस त्सित्सिपासचा पराभव करत दुसऱ्यांदा १९ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले. सविस्तर वाचा..