मुंबई - राज्यात गुरुवारी १२,२०७ नवीन रुग्णांचे निदान झाले. तर ११,४४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५६,०८,७५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.४५% एवढे झाले आहे. दरम्यान, राज्यात गुरुवारी ३९३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सविस्तर वाचा..
मुंबई - शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाख रुपयेपर्यंतच्या कर्जासाठी 0 टक्के दराने व्याज आकारणी केली जाणार आहे. 1 लाख ते 3 लाख रुपयांच्या कर्जमर्यादेत विहित मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास सध्याच्या 1 टक्के व्याजदरात आणखी 2 टक्के व्याज दर सवलत मिळणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 3 लाखापर्यंतचे पीक कर्ज 0 टक्के व्याज दराने देण्याची घोषणा केली होती. सविस्तर वाचा..
कोची - प्रेम आंधळ असते असे म्हणतात. प्रेमात लोक काहीही करतात, हे तुम्ही अनेकदा पाहिलंही असेल आणि ऐकलंही असेल. प्रेमात लोके एवढी वेडी होतात की आपण काय करतोय हेच बऱ्याच जणांना कळत नाही. अशीच एक पराक्रमी घटना केरळच्या पलक्कडमध्ये समोर आली आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, मात्र, एका तरुणाने आपल्या प्रियसीला तब्बल 10 वर्ष घरामध्येच लपवून ठेवलं. विशेष म्हणजे, घरातील सदस्यांनाही याचा थांगपत्ता लागला नाही. सविस्तर वाचा..
मुंबई - मालाड, मालवणी येथे काल रात्री ११ च्या सुमारास एक दुमजली घर शेजारील घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १८ जण जखमी झाले. या जखमींना रुग्णालयात दाखल केले असता, त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला. आज सायंकाळी शोध कार्य सुरु असताना ढिगाऱ्याखालून आणखी एका व्यक्तीला बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे मालाड दुर्घटनेत जखमींची आकडा १९ वर तर मृतांचा आकडा १२ वर पोहचला आहे. या दुर्घटनेत एकाच कुटूंबातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा..
गुरुवारी राज्यात ११,४४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५६,०८,७५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.४५% एवढे झाले आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - कोरोना संदर्भातील याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान म्यूकरमायकोसिस बद्दल कोर्टात युक्तीवाद करण्यात आला. त्यावर म्युकरमायकोसिसवरील औषधांचे वितरण रूग्ण संख्या आणि राज्यांच्या गरजेनुसार का होत नाही? असा सवाल न्यायालयाने केंद्र सरकारला केला. तर "मराठी वृत्तवाहिन्यातून काळ्या बुरशीबाबत व्यापक जनजागृती करा", असे मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिले. यावेळी राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी युक्तीवाद केला. सविस्तर वाचा..
अहमदनगर - गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून शेतात तेच ते पारंपरिक खाण्यांच्या पिकांचीच शेतीत मोठ्या प्रमाणात केल्या जाते. या पिकातून शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. त्यामुळे पारंपरिक पिकांना फाटा देण्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्यायच उरला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील राहता तालुक्यातील रांजणखोल येथील स्वप्निल दौंड या प्रयोगशील शेतकऱ्यांने आपल्या शेतात जिरेनियमची लागवड केली. जिरेनियमच्या पाल्यापासून तेल तयार केले. या तेलाला १२ हजार ५०० रुपये लीटर या दर मिळाल्याने तीन महिन्यात दोन एकर शेतीत दोन लाखाचा नफा मिळवला आहे. सविस्तर वाचा..
नवी दिल्ली - केंद्र सरकारने खरीप पिकांसाठीची किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपी जाहीर केली आहे. कापसाचा एमएसपी 200 रुपयांनी तर तुरीचा 300, उडीदाचा 300 रुपये आणि सोयाबीनचा एमएसपी 70 रुपयांनी वाढविण्यात आला आहे. सविस्तर वाचा..
कोची - प्रेम आंधळ असते असे म्हणतात. प्रेमात लोक काहीही करतात, हे तुम्ही अनेकदा पाहिलंही असेल आणि ऐकलंही असेल. प्रेमात लोके एवढी वेडी होतात की आपण काय करतोय हेच बऱ्याच जणांना कळत नाही. अशीच एक पराक्रमी घटना केरळच्या पलक्कडमध्ये समोर आली आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, मात्र, एका तरुणाने आपल्या प्रियसीला तब्बल 10 वर्ष घरामध्येच लपवून ठेवलं. विशेष म्हणजे, घरातील सदस्यांनाही याचा थांगपत्ता लागला नाही. सविस्तर वाचा..
कलात्मक स्वातंत्र्याच्या (artistic liberty) व्याप्तीबाबत नेहमीच वाद विवाद होत आले आहेत. एका इटालियन समकालीन कलाकाराने आपली ‘अदृश्य’ निर्मिती तब्बल $१८,३०० डॉलर्स किंमतीला विकल्यानंतर सोशल मीडियावर वादळ निर्माण झाले आहे. एका कलाकाराने या मोठ्या प्रमाणावर ‘काहीच’ विकले नाही याबद्दल जग हैराण झाले असताना, एका देसी माणसाने असा दावा केला की आम्ही भारतीयांनी २००७ मध्येच हा चमत्कार केला होता. सविस्तर