ETV Bharat / bharat

Top 10 @ 7 PM : सायंकाळी सातच्या ठळक बातम्या! - देशातील टॉप बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10 @ 7 PM
Top 10 @ 7 PM
author img

By

Published : Mar 28, 2021, 12:08 PM IST

Updated : Mar 28, 2021, 7:13 PM IST

  1. नवी दिल्ली - राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी संसद आणि विधिमंडळात होणाऱ्या गोंधळावर चिंता व्यक्त केली. संसदेत गोंधळ घातल्याने चर्चेत बाधा निर्माण होते. यामुळे लोकशाही आणि देशाचे नुकसान होते. संसदेत याचप्रकारे गोंधळ होत गेल्यास लोकांचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास उडेल, असे व्यंकय्या नायडू म्हणाले. माजी खासदार आणि हैदराबाद इथले शिक्षणतज्ज्ञ नुकला नरोथम रेड्डी यांच्या जन्मशताब्दी समारंभात ते बोलत होते. सविस्तर वाचा..
  2. अमरावती - मेळघाटमधील गुगामल वन्यजीव परिक्षेत्राच्या आरएफओ दिपाली चव्हाण यांनी वरिष्ठ उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या मानसिक त्रासाला कंटाळून गुरुवारी रात्री आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूला वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमारच जबाबदार असल्याचे लिहले आहे. त्यानंतर आरोपी शिवकुमारला पोलिसांनी नागपूरमधून अटकही केली आहे. दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात खळबळ माजली आहे. दरम्यान प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे. दिपाली यांनी मृत्यूपूर्वी आपले पती राजेश मोहिते यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. ते पत्र ईटीव्ही भारतच्या हाती लागले आहे. त्यामध्ये "मनीषा उईके तिच्या आयुष्यात कधीच सुखी होणार नाही तिने माझे आयुष्य बरबाद केले आहे", अशी ओळ दीपाली यांनी लिहिलेली आहे. त्यामुळे आता मनिषा उईके ही कोण आहे? दीपाली चव्हाण यांनी तिचा उल्लेख का केला? तिने माझे आयुष्य बरबाद केले आहे, असे त्यांनी का लिहिले? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सविस्तर वाचा..
  3. मुंबई - पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त 'सॅल्यूट' घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो, हे विसरुन कसे चालेल? असा सवाल करत शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाल्याचे म्हटले आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या रोखठोक या सदरातून खासदार संजय राऊत यांनी आपल्याच पक्षाच्या नेतृत्वातील सरकारला घरचा आहेर दिल्याचे मानले जात आहे. सविस्तर वाचा..
  4. अमरावती - हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या खळबळजनक घटनेनंतर मेळघाटातील 'रेड्डी राज'चे काळे वास्तव समोर येत आहे. खासदार नवनीत राणा यांनी तर रेड्डीची मेळघाटात पैसे खाऊ टीम असल्याचा आरोप केला आहे. उपवनसंरक्षक शिवकुमार हा अपर प्रधान उपवन संरक्षक असणाऱ्या श्रीनिवास रेड्डींच्या या पैसे खाणाऱ्या टीमचा एक सदस्य होता, असे नवनीत राणा म्हणाल्या. सविस्तर वाचा..
  5. मुंबई - श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या आणि सुमारे दीड कोटी नागरिकांना सोयी सुविधा पुरवणाऱ्या मुंबई महापालिकेत तब्बल 38 हजार 128 पदे रिक्त असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. पालिकेत सरळसेवा आणि पदोन्नती अंतर्गत एकूण 1 लाख 10 हजार 509 पदे मंजूर असून त्यापैकी 38 हजार 128 पदे रिक्त आहेत. सर्वाधिक पदे ही क आणि ड वर्गाची असून त्याची संख्या 33,043 आहे. सविस्तर वाचा..
  6. मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओत स्फोटक व धमकीचे पत्र ठेवल्याची कबुली सचिन वाझे याने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) दिल्यानंतर यात आणखीन एक खुलासा करण्यात आला आहे. 25 फेब्रुवारी रोजी अँटिलिया या इमारतीच्या बाहेर स्कॉर्पिओ ठेवण्यात आली होती. स्कॉर्पिओ मागे जी ईनोव्हा होती, त्यामध्ये सचिन वाझे होता. जिलेटीन कांड्या असलेली स्कॉर्पिओ अँटिलिया बाहेर पार्क केल्यानंतर गाडीमध्ये धमकीचे पत्र ठेवण्याचे सचिन वाझे विसरला होता. काही अंतर पुढे गेल्यानंतर परत मागे फिरून वाझेने धमकीचे पत्र स्कॉर्पिओ गाडीत ठेवले होते. सविस्तर वाचा..
  7. मुंबई - अभिनेता परेश रावल यांनी काही दिवसापूर्वी कोरोनाची लस घेतली होती. लस घेतानाचा फोटटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. दरम्यान परेश रावल यांनी आपली कोविड १९ चाचणी केली असता ती पॉझिटीव्ह आली आहे. सविस्तर वाचा..
  8. मुंबई - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत आहे. आज राज्यात तब्बल 35 हजार 726 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 166 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दररोज वाढणारी ही आकडेवारी चिंतेत भर घालणारी आहे. 2020 च्या अखेरीस कोरोना रुग्णांमध्ये घट झाली होती. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. सविस्तर वाचा..
  9. होळी हा एक हिंदू सण आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी सण पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो. विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा रंगांचा एक सण आहे. देशभरात होळी अनेक नावे आहेत. या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, शिमगा, धुळवड, होळी पौर्णिमा, धूलिवंदन व रंगपंचमी अशी विविध नावे आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी होळी साजरी करताना अनेक प्रथा आहेत. त्याविषयी आपण जाणून घेऊ... सविस्तर वाचा..
  10. कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानभा निवडणुकीचे पडघम वाजले आहे. शनिवारी पश्चिम बंगालमध्ये 5 जिल्ह्यातील 30 विधानसभा मतदारसंघात हे मतदान पार पडले. काही ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या. हिंसक घटनेत सहभाग घेतेल्या 10 जणांना अटक करण्यात आली आहे. ही माहिती पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी आरिज आफताब यांनी दिली. सविस्तर वाचा..

अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा...

Last Updated : Mar 28, 2021, 7:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.