ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या! - देशातील महत्त्वाच्या बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

todays top news
Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या!
author img

By

Published : Jun 24, 2021, 10:54 PM IST

  1. पुणे - देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता महाराष्ट्र, केरळ आणि मध्यप्रदेश राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट डेल्टा प्लसचे काही रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर संशोधनही करण्यात येत आहे. सविस्तर वाचा...
  2. मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट घातक ठरली. राज्य सरकारने ही लाट ओरसत असताना लॉगडाऊनचे नियम शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. पाच स्टेपमध्ये हे निर्बंध शिथिल केले जात आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आलेख हा सातत्याने चढ-उताराचा दिसून येत आहे. 23 जून रोजी राज्यात उपचारादरम्यान 163 जणांचा मृत्यू झाला होता. तर हा आकडा वाढून 24 जूनला (गुरुवारी) 197 इतका झाला आहे. राज्यात एकूण कोरोना रुग्णांच्या मृतांची संख्या 1 लाख 19 हजार 859 इतकी आहे. तर राज्यातील मृत्यूदर 2 टक्क्यांवर आला आहे. सविस्तर वाचा...
  3. नवी दिल्ली - देशातील कॉर्पोरेट कंपन्यांकडून सरकारी बँकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार अजूनही सुरू आहेत. सीबीआयने सीजी पॉवर आणि इंडस्ट्रीयल सोल्यूशन्सचे चेअरमन गौतम थापर यांच्याविरोधात नव्याने गुन्हा दाखल केला आहे. या उद्योगपतीचा येस बँक आणि इतर बँकांच्या २,३४५ कोटी रुपयांच्या फसवणुकीत सहभाग असल्याचा आरोप आहे. सविस्तर वाचा...
  4. मुंबई - अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशी व्हावी, असा प्रस्ताव प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत पारित करण्यात आला, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. सविस्तर वाचा...
  5. मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षांमध्ये शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त संस्थेमध्ये अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी शुल्क व्यतिरिक्त इतर शुल्कात २५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. त्यामुळे २० हजार अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सविस्तर वाचा...
  6. मुंबई - "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पाठोपाठ तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका कायम आहे. त्याचा मुकाबला करायचा आहे. तसेच डेल्टा प्लेस या उत्परिवर्तित विषाणूचा देखील धोका आहे. त्यामुळे आरोग्य सेवा सुविधा वाढवून घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका. तसेच आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे", असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या ७ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आज (गुरुवार) ते दूरचित्र प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची देखील उपस्थिती होती. सविस्तर वाचा...
  7. पुणे - कर चुकवणाऱ्या करदात्यांविरोधात महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाई दरम्यान राज्य जीएसटी पुणे विभागाने १३० कोटींपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके सादर केल्याप्रकरणी ओमप्रकाश तिरथदास सचदेव या व्यापाऱ्याला पुणे येथून अटक करण्यात आली. सहायक राज्यकर आयुक्त बी.व्ही. जुंबड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. सविस्तर वाचा...
  8. मुंबई/पुणे - पुण्यातील आंबिल ओढ्यात आज(24 जून) पालिकेने अतिक्रमण हटवण्याची काम हाती घेतले होते. त्यावेळी स्थानिक नागरिक आक्रमक होत, या कारवाईला विरोध केला होता. दरम्यान, 134 घरांपैकी 29 घरे याधीच दोनशे मीटर लांब असलेल्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये स्थलांतरित करण्यात आली होती. तर 50 घरे आज स्थलांतरित करण्यात आली आहेत. राज्य सरकार कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. सविस्तर वाचा...
  9. नवी दिल्ली - भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात शांघाय सहकार्य संस्थेत(एससीओ) कठोर भूमिका घेतली आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांविरोधात कठोर कारवाई करण्यासाढी जागतिक कृती कार्यक्रम निश्चित करण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी एससीओ बैठकीत ठेवला आहे. सविस्तर वाचा...
  10. नवी दिल्ली - येत्या तीन ते पाच वर्षांत रिलायन्स इंडस्ट्रीजची मालकी असलेली रिलायन्स रिटेल तिप्पटीने वाढणार असल्याचे कंपनीचे चेअरम मुकेश अंबानी यांनी गुरुवारी सांगितले. ते रिलायन्स इंडस्ट्रीच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत बोलत होते. रिलायन्स रिटेलच्या प्रगतीमुळे १० लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचेही अंबानी यांनी यावेळी सांगितले. सविस्तर वाचा...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.