- मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. राज्यात सोमवारी नव्या 6,270 कोरोना रुग्णांची भर पडली असून 94 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आज 13758 जणांना रुग्णालयातून डिस्रार्च देण्यात आला आहे. राज्यात सद्यस्थिती 124398 सक्रिय रुग्ण असून 57,33,215 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.89 टक्के एवढा आहे. तर राज्यात आतापर्यंत 1,18,313 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा...
- नवी दिल्ली - निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. यापूर्वीही दोघांची शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट झाली होती. आता पुन्हा दोघांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ असून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. आगामी उत्तर प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणूक आणि 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून या बैठकीकडे पाहिले जात आहे. दरम्यान, उद्या (मंगळवार) दुपारी ४ वाजता १५ राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत शरद पवार बैठक घेणार आहेत. यात सध्याची राजकीय आणि आर्थिक स्थितीवर सर्वांगिण चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे. या बैठकीला मनिष तिवारी आणि शत्रुघ्न सिन्हा उपस्थित राहण्याची शक्यता नाही. खासगी कामामुळे बैठकीला उपस्थित राहता येणार नाही, असे त्यांनी कळविल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. सविस्तर वाचा...
- पुणे - प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि उद्योगपती अविनाश भोसले यांची तब्बल 40 कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. अविनाश भोसले यांची काही दिवसांपूर्वीच मुंबईतील कार्यालयात चौकशी केली होती. त्यानंतर त्यांच्या पुण्यातील घरी छापेमारी देखील करण्यात आली होती. त्यानंतर भोसले यांच्या पुणे, नागपूर आणि गोवा येथील मालमत्ता जप्त करण्यात आल्या. विदेशी विनियम व्यवस्थापन कायदा 1999 (फेमा) कलम उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. सविस्तर वाचा...
- नागपूर - एकाच कुटुंबातील पाच सदस्यांची चाकूने भोकसून हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः आत्महत्या केल्याच्या घटनेने आज संपूर्ण नागपूरसह राज्य हादरून गेले आहे. आरोपी आलोक माटूरकर याने अतिशय थंड डोक्याने हे षडयंत्र रचले होते. याचा खुलासा तपासादरम्यान झाला आहे. काही दिवसांपूर्वी मेहूणीसोबत झालेल्या वादाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने आरोपीने स्वतःच्या कुटुंबाला का संपवले, या बाबीचा खुलासा होऊ शकलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी आरोपी आलोकच्या नातेवाईकांकडे चौकशी करून काही सुगावा मिळतो का, याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी मृतक आरोपी आलोकच्या घरातूनच चाकू जप्त केला आहे. सविस्तर वाचा...
- मुंबई - आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र, भाजपाशी युती केल्यास शिवसेनेला ते परवडणार नाही. तसेच शिवसेनेचे खच्चीकरण आणि राजकीय दृष्ट्या कमकुवत केल्याशिवाय भाजपा राहणार नाही, असे मत राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने भाजपाला आव्हान देऊ नये, अशी भाजपाची तजवीज यामागे असल्याचेही प्रधान यावेळी म्हणाले. सविस्तर वाचा...
- नवी दिल्ली - राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष (निवृत्त न्यायाधीश) अरुण मिश्रा यांनी निवडणुकीनंतर झालेल्या पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या माजी अध्यक्षांनी इंटेल ब्युरोचे माजी अध्यक्ष राजीव जैन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. सविस्तर वाचा...
- हैदराबाद - अनेक शतकांपासून भारतीय लोक हे सोन्यामधील गुंतवणुकीला प्राधान्य देत आले आहे. शेअर बाजार, म्यूच्युअल फंड व स्थावर मालमत्ता आदी गुंतवणुकीचे पर्याय असले तरी सोन्यांमधील गुंतवणूक हे नेहमीच वाढलेली आहे. विशेषत: अर्थव्यवस्थेचा विकासदर घसरला असताना ही गुंतवणूक वाढलेली आहे. सविस्तर वाचा...
- सांगली - भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही मराठा समाजासह ओबीसींच्या मुळावर उठल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. राज्य सरकारमधील ओबीसी नेते हे नुसते बोलघेवडे आहेत. आरक्षणावर लोणावळ्यात बैठक घेण्यापेक्षा मंत्रालयात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावावा असे देखील त्यांनी म्हटले आहे. दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर 26 जून रोजी भाजपा आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ते सांगलीमध्ये बोलत होते. सविस्तर वाचा...
- बीड - पत्नीच्या सततच्या छळाला कंटाळलेल्या मृत वनरक्षक असलेल्या पतीने दिड महिन्यापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अनिल आबासाहेब जगताप (रा. टाकळसींग, ता. आष्टी) असे मृत वनरक्षकाचे नाव आहे. लग्नाच्या अगोदर खर्च केलेल्या पगाराचा हिशोब मागणे, आई-वडिलांना पैसे दिल्यामुळे केलेली मारहाण आणि शेती नावावर करण्यावरून पत्नी सतत त्रास देत असल्यामुळे अनिल यांनी गळफास घेत आपली जीवन संपवले. या प्रकरणी पत्नीसह चौघांवर आष्टी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सविस्तर वाचा...
- बंगळुरू - सीडी स्कँडल प्रकरणात भाजपच्या नेत्यांकडून सहकार्य मिळत नसल्याने माजी मंत्री रमेश जारकीहोळी हे निराश झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेतली आहे. सविस्तर वाचा...
Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या...
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...