मुंबई - राज्यातील कोरोना परिस्थितीसह कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून घेण्यात आला. यावेळी म्यूकर मायकोसिस आजार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समावेश करण्यात आला. म्यूकर मायकोसिसवरील औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी उपलब्धा करून देण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले. तसेच, लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यासह ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याचे उपमुख्यमंत्र्यांकडून निर्देश देण्यात आले. सविस्तर वाचा..
मुंबई - कोरोना विषाणूच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे उपचार करताना किंवा करून झाल्यावर रुग्णांना म्युकरमायकोसिस हा काळ्या बुरशीचा आजार झाल्याचे समोर आले आहे. हा आजार जीवघेणा आहे. या आजाराचे मुंबईत 150 रुग्ण असून त्यापैकी केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसिसमुळे हा पहिला मृत्यू आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - अरबी समुद्रात निर्माण झालेले तौक्ते चक्रीवादळ आता संथपणे गुजरातच्या दिशेने सरकत आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागाला या चक्रीवादळाचा चांगलाच तडाखा बसला आहे. चक्रीवादळामुळे एकूण ६ जणांचा मृत्यू झाला, तर ९ जण जखमी झाले आहेत. आज (१७ मे) दिवसभर मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये मोठे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी झाडे कोसळली आहेत. त्यामुळे घरांचेदेकील नुकसान झाले आहे. तर रायगडमध्ये या चक्रीवादळाने तीन जणांचा बळी घेतला आहे. दरम्यान, निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला असून, मदतकार्य वेगाने करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. सविस्तर वाचा..
रत्नागिरी - तौक्ते चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर अनेक ठिकाणी पडझड करुन उत्तरेकडे सरकले. या वादळाने रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक घरे आणि झाडांचे मोठं नुकसान केले आहे. महसूल खात्याने तत्काळ पंचनामे करण्याचे काम हाती घेतले आहे. रविवारी दुपारपासून सुरू झालेली पावसाची संततधार सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास थांबली. आज वादळ शांत झाल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत होतं. समुद्रही दुपारनंतर काहीसा शांत झाला होता. सविस्तर वाचा..
मुंबई - अरबी समुद्रात उठलेले तौत्के चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकणपट्टीतील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. तसेच अनेक ठिकाणी वीज खंडित झाल्याने सुरू असलेल्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षापासून अनेक विद्यार्थी वंचित राहिले आहे. मात्र, त्या विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, लवकरच परीक्षा घेतली जाईल अशी माहिती, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - राज्यातील कोरोना परिस्थितीसह कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून घेण्यात आला. यावेळी म्यूकर मायकोसिस आजार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समावेश करण्यात आला. म्यूकर मायकोसिसवरील औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी उपलब्धा करून देण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले. तसेच, लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यासह ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याचे उपमुख्यमंत्र्यांकडून निर्देश देण्यात आले. सविस्तर वाचा..
मुंबई - आज दुपारी दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी ट्रॉम्बे आणि माहूल येथील जेट्टीच्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारने कोळी बांधवांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. सविस्तर वाचा..
मुंबई - कोरोना विषाणूच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे उपचार करताना किंवा करून झाल्यावर रुग्णांना म्युकरमायकोसिस हा काळ्या बुरशीचा आजार झाल्याचे समोर आले आहे. हा आजार जीवघेणा आहे. या आजाराचे मुंबईत 150 रुग्ण असून त्यापैकी केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसिसमुळे हा पहिला मृत्यू आहे. सविस्तर वाचा..
पणजी (गोवा) - राज्यात कोरोना कहर सुरूच आहे. कोरोनामुळे आणखीन ५३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर नव्याने १५६२ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वतः ट्विट करत दिली आहे. तर कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याचा रुग्नालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे कारागृहातील इतर कोरोनाबाधित कैदीही हादरले आहेत. सविस्तर वाचा..
जुनागड (गुजरात) - महाराष्ट्रानंतर अखेर तौक्त चक्रीवादळ सोमवारी रात्री उशीरा गुजरातमधील दीव व उना दरम्यानच्या किनारपट्टीवर दाखल झाला आहे. दीव, उना आणि कोडिनार येथे ताशी १२० पेक्षा अधिक किमी वेगाने वारा वाहतो आहे. वाऱ्याच्या वेगामुळे अनेक ठिकाणी 200 हून अधिक झाडे व मोबाइल टॉवर कोसळल्याची माहिती आहे. सविस्तर वाचा..