ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या..!

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

रात्री अकरा
रात्री अकरा
author img

By

Published : May 16, 2021, 3:03 PM IST

Updated : May 16, 2021, 10:41 PM IST

  1. रायगड - तौक्ते चक्रीवादळ रायगड जिल्ह्यात पहाटे दाखल होणार असल्याची शक्यता आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणारे तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या 2,254 नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सुस्थळी हलविले आहे. रात्रीत अजून काही हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याबाबत प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. वादळाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती निवारण कक्षात वॉर रूम तयार करून यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे. सविस्तर वाचा...
  2. मुंबई : तौक्ते चक्रीवादळ हे सध्या कर्नाटकच्या किनारपट्टीवर असून; गोव्यापासून ते १७०, तर मुंबईपासून ५२० किलोमीटर दूर आहे. इथून गुजरातकडे जाण्यासाठी त्याला तीन दिवस लागतील. १८ मेच्या पहाटे ते गुजरातच्या पोरबंदर आणि महुआ किनाऱ्यावरुन पुढे जाईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सविस्तर वाचा...
  3. जळगाव - वादळामुळे खळ्यातील झोपडीवर चिंचेचे झाड कोसळून दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज (रविवारी) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील अंचलवाडी येथे घडली आहे. ज्योती बल्लू बारेला (वय १६) आणि रोशनी बल्लू बारेला (वय १०) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत. सविस्तर वाचा...
  4. मुंबई - गेल्या वर्षभरापासून स्वतःच्या जिवाची काळजी न करता अहोरात्र एसटी महामंडळाचे रक्षण करणारे 1 हजार 300 खासगी सुरक्षा रक्षक गेल्या तीन महिन्यांपासून वेतनाविना काम करत आहे. त्यामुळे, त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? असा मोठा प्रश्न या सुरक्षा रक्षकांना पडलेला आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने आढावा घेतला. सविस्तर वाचा...
  5. मुंबई - राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यात आज (दि. 16 मे) एकाच दिवशी 59 हजार 318 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात 48 लाख 26 हजार 371 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दुसरीकडे 34 हजार 389 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत 53 लाख 78 हजार 452 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र, या लाटेत रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून राज्यात एकाच दिवसात 974 रुग्णांनी उपचारादरम्यान आपले प्राण गमावले आहे. सविस्तर वाचा...
  6. मुंबई - मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. त्यानंतर भाजपा विरूद्ध ठाकरे सरकार असा सामना सुरू झाला आहे. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने विधानसभेत केलेला कायदा हा फूलप्रुफ नव्हता, असे मत ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी व्यक्त केले. त्यावर आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे. सविस्तर वाचा...
  7. सांगली - केंद्र सरकारकडून खतांच्या किंमतीमध्ये करण्यात आलेल्या वाढीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निषेध नोंदवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत खतांच्या दरांमध्ये वाढ केल्याच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन करण्यात असल्याचे जाहीर केले आहे. सविस्तर वाचा...
  8. पणजी (गोवा) - गोव्याला तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. गोव्यात दोन मृत्यूंची नोंद झाली आहे असून ५०० हून अधिक झाडे कोसळली आहेत. सुमारे १०० घरांचे मोठे आणि १०० घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. तर, वीजपुरवठा खंडित झाला असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. सविस्तर वाचा...
  9. चंदीगढ - हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर रविवारी हिसारच्या ओपी जिंदल मॉडर्न स्कूलमध्ये चौधरी देवीलाल संजीवनी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी दाखल झाले होते. तेव्हा रामायण टोल व सतरोड कालव्याजवळ आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा विरोध दर्शवला. यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये चकमक झाली. यात जवळपास 50 पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. सविस्तर वाचा...
  10. चंदीगढ - ईदच्या निमित्ताने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुस्लिमबहुल क्षेत्र असलेल्या मलेरकोटलाला पंजाबचा 23 वा जिल्हा म्हणून घोषित केले आहे. यावरून नवा वाद पेटला आहे. मलेरकोटची निर्मिती ही काँग्रेसच्या फाळणीच्या धोरणाचे प्रतिबिंब आहे, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर केली. त्याला अमरिंदर सिंग यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. सविस्तर वाचा...

Last Updated : May 16, 2021, 10:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.