ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या! - देशातील महत्त्वाच्या बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top ten news stories around the globe
Top 10 @ 11 AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या!
author img

By

Published : May 10, 2021, 7:03 AM IST

Updated : May 10, 2021, 11:16 AM IST

  1. पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा..
  2. नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असताना मालेगावात मात्र सर्वकाही अलबेल असल्याचे चित्र आहे. कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, मालेगावात प्रशासनाकडून लागू करण्यात आलेल्या कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. सविस्तर वाचा..
  3. मुंबई : देशातील कोरोनाच्या स्थितीवरून सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. देशातील बिकट स्थिती पाहून सर्वोच्च न्यायालयाने टास्क फोर्सची स्थापना करत केंद्र सरकार कोरोनाची स्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्यावर शिक्कामोर्तब केल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे. सविस्तर वाचा..
  4. पालघर - बोईसर- तारापूर एमआयडीसी येथील तुंगा या खासगी कोविड रुग्णालयातील व्यवस्थापकाला रुग्णाच्या भाजपा पदाधिकाऱ्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. सविस्तर वाचा..
  5. अहमदनगर - दिवसेंदिवस जामखेड शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागला आहे. कोरोना रुग्णसंख्येची वाढती संख्या पाहून प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी जामखेड शहरात आजपासून (१० मे) दहा दिवसांचा(२० मे पर्यंत) जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर वाचा..
  6. नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी दीक्षाभूमी येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन भन्ते नागार्जुन सुरइ ससाई यांच्या हस्ते करण्यात आले. सविस्तर वाचा..
  7. नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील परिस्थिती आता काही प्रमाणात सुधारत असल्याचे दिसून येत आहे. मागील पाच दिवसात मृतांचा आकडा ३०० हून अधिक राहिला होता त्यामध्ये आज काही प्रमाणात कमी आली. सविस्तर वाचा..
  8. मुंबई - आज (दि. 9 मे) राज्यात एकाच दिवशी 60 हजार 226 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 44 लाख 7 हजार 818 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर राज्यात आज 48 हजार 401 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून आज 572 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा..
  9. मुंबई - सामनाच्या रोखठोकमध्ये संजय राऊत यांनी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालावर भाष्य करत कॉंग्रेसवर आणि कॉंग्रेसच्या नेतृत्त्वावर टीका केली होती. या टीकेचा नाना पटोले यांनी समाचार घेतला. 'आम्ही सामना वृत्तपत्र वाचत नाही', असे नाना पटोले म्हणाले आहेत. सविस्तर वाचा..
  10. मुंबई - महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती चांगली आहे. याउलट इतर राज्यांमधील पक्षांना ते कोरोना परिस्थिती हाताळण जमले नाही. त्यामुळे तिथे आज चिता पेटलेल्या आहेत, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत केली आहे. सविस्तर वाचा..

Last Updated : May 10, 2021, 11:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.