ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या... - देशातील महत्त्वाच्या बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top ten news stories around the globe
Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या...
author img

By

Published : Mar 17, 2021, 9:29 PM IST

Updated : Mar 17, 2021, 10:48 PM IST

  • मुंबई : राज्यात बुधवारी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. राज्यात बुधवारी 23 हजार 179 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय. तर 24 तासांत 84 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात मृत्युदर 2.24 टक्के इतका आहे. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळल्याने राज्याची चिंता वाढली आहे. नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज यामुळे व्यक्त होत आहे.

बापरे! राज्यात बुधवारी 23 हजार 179 नवे कोरोनाग्रस्त

  • मुंबई - देशाच्या राजधानीत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचे आज 2, 377 रुग्ण आढळून आले आहेत. तर आजपर्यंतच्या कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 49 हजार 958 वर पोहचला आहे. कोरोनामुळे 8 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 547 वर पोहचला आहे.

मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येचा चढता आलेख; आज 2377 नवे रुग्ण

  • मुंबई - अँटिलिया प्रकरणात आता अनेक खुलासे समोर येत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर दबाव वाढताना दिसला होता. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. काल रात्री त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक घेतली. या बैठकीत पोलीस महासंचालक हेमंत नगराळेदेखील उपस्थित होते. यानंतर आज राज्याच्या गृहखात्याकडून मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर तेच दुसरीकडे अँटिलिया प्रकरणांत आजही अनेक घडामोडी घडल्या. याबाबतचा आढावा...

अँटिलिया प्रकरण : पीपीई कीटमध्ये सचिन वाझेच; काय घडले आज दिवसभरात?

  • मुंबई - अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक आणि वाझे प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. एनआयए आणि एटीएस हे योग्यरित्या तपास करत आहेत. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. हेमंत नगराळे यांनी आज(17 मार्च) मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे.

स्फोटकं प्रकरणाचा तपास योग्य दिशेने, दोषींवर कारवाई होईल - मुंबई पोलीस आयुक्त

  • मुंबई : सचिन वाझे प्रकरणावरून अडचणीत आलेल्या ठाकरे सरकारने हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. परमबीर सिंग यांची या पदावरून उचलबांगडी करून महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती या पदावर करण्यात आली आहे. हेमंत नगराळे यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया...

अंजनाबाई गावित तपास ते मुंबई दहशतवादी हल्ला, अशी आहे हेमंत नगराळेंची कारकिर्द

  • दिल्ली : महाविकास आघाडी सरकार पत्रकारपरिषदेत सचिन वाझेंचा बचाव करत होते. याचा काय अर्थ आहे? हेदेखील तपास यंत्रणांना शोधावे लागेल. सचिन वाझेंना ऑपरेट करणारे लोक सरकारमध्ये बसले आहेत, असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच त्यांचा शोध घेणे गरजेचे आहे, अशी मागणीही त्यांनी केली. दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अँटिलिया प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह याची उचलबांगणी करण्यात आली. त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीस अधिकारी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सचिन वाझेंना ऑपरेट करणारे राजकीय बॉस कोण -देवेंद्र फडणवीस

  • मुंबई - पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझे यांच्यासंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणे कशाप्रकारे तपास केला हे सांगण्याचा प्रयत्न केला. या यंत्रणेने तपास केला नसता तर या सर्व बाबी बाहेर आल्या नसत्या, अशा प्रकारचा आरोपही त्यांनी यावेळी केला. मात्र, एवढी मुद्देसूद माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कशी? असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ची तपास यंत्रणा तयार करावी - सचिन सावंत

  • मुंबई - राज्यात महाविकास आघाडीतील मंत्री किंवा अधिकाऱ्यांवर विरोधकांच्या आरोपानंतर राजीनामा, चौकशी करून निलंबन आदी कारवाया केल्या जात आहेत. परंतु, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना नेमकी उलट परिस्थिती होती. विरोधकांनी तत्कालीन भाजप सरकारमधील एखाद्या मंत्र्यांवर आरोप केल्यास ते क्लिनचिट देत होते. या घडामोडी पाहता राज्यात लोकशाही मार्गाने महाविकास आघाडी सरकारचे काम सुरू असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. याबाबत ईटीव्ही भारतचा तुलनात्मक राजकीय रिपोर्ट..

ईटीव्ही भारत विशेष : फडणवीस ते ठाकरे सरकार अन् क्लीन चिट ते राजीनामा व्हाया चौकशी

  • मुंबई - सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांच्या जागी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची वर्णी लागली आहे. तर, आता नवीन पोलीस महासंचालक पदी रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

फोर्स वनचे प्रमुख ते पोलीस महासंचालक, अशी आहे रजनीश सेठ यांची कारकिर्द

  • मुंबई - ‘सैराट’ चित्रपटातील प्रेमकथा खूपच गाजली होती. त्या चित्रपटाचा पगडा आजही काही चित्रपटांच्या कथानकावर दिसतो. अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरलेल्या या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीतला एक गुणी अभिनेत्री मिळाली ती म्हणजे रिंकू राजगुरू जिला ‘सैराट’ मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने (खास नोंद) सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर ‘कागर’ आणि ‘मेकअप’ हे मराठी चित्रपट तिने केले. तसेच हिंदीत तिने ‘हंड्रेड’ नावाची वेब सिरीज केली ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता रिंकू राजगुरू एका नवीन ‘आठवा रंग प्रेमाचा’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू घेऊन येतेय ‘आठवा रंग प्रेमाचा’!

Last Updated : Mar 17, 2021, 10:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.