- मुंबई - आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात गेल्या वर्षीच्या मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र नागरिकांकडून कोरोना संदर्भातील नियमांचे पालन केले जात नसल्याने रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या 6 हजाराच्या वर होती, 22 फेब्रुवारीला त्यात किंचित घट झाली होती. मात्र, त्यात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. राज्यात आज तिसऱ्या दिवशीही 8 हजाराच्यावर रुग्णसंख्या आढळून आली आहे. शुक्रवारी राज्यात 8333 नवीन रुग्ण आढळून आले, तर 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर वाचा- CORONA LIVE UPDATE : शुक्रवारी राज्यात 8 हजारापेक्षा अधिक रुग्ण, तर 48 रुग्णांचा मृत्यू
- मुंबई- बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि कंगना रणौतमधील शीतयुद्ध आता कायदेशीर प्रकरणापर्यंत गेले आहे. अभिनेता ऋतिक रोशनला कंगना प्रकरणात समन्स बजावण्यात आला आहे. ऋतिक रोशनच्या तक्रारीच्या अनुषंगाने हा समन्स बजावण्यात आला आहे. मुंबई क्राईम ब्रांचतर्फे हा समन्स बजावण्यात आला होता. आज (शनिवारी) ऋतिक रोशनला जबाब नोंदवण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार ऋतिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाला आहे.
सविस्तर वाचा- कंगनासोबत वादग्रस्त ई-मेल प्रकरण; ऋतिक रोशन मुंबई गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर
- मुंबई - "महाविकास आघाडीचा एक मंत्री गर्दी जमवून धुडगूस घालतो. त्याला कोणतीही बंधने नाहीत. मात्र, कोरोनाचे कारण देऊन मराठी भाषा दिन आणि शिव जयंतीच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली जाते. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला धारेवरती धरले आहे. सरकारला जर कोरोनाची भीती असेल तर आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकासुद्धा पुढे ढकला,” असा खोचक सल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी भाषा दिनानिमित्त शिवाजी पार्कमध्ये कार्यक्रमक आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सविस्तर वाचा- 'महाविकास आघाडीचा एक मंत्री गर्दी जमवून धुडगूस घालतो मात्र, मराठी भाषा दिन अन् शिवजयंतीला परवानगी नाकारली जाते'
- नाशिक - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्यासह महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सरकार, पोलीस बलात्काऱ्यांना वाचवत असल्याची घणाघाती टीका केली. राज्यात शिवशाही नसून मोगलाई असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
सविस्तर वाचा- राज्यात शिवशाही नाही, ही तर मोघलाई; चित्रा वाघांचा महाविकास आघाडीवर घणाघात
- मुंबई - भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्यावर चार लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. 12 फेब्रुवारीला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने हा गुन्हा दाखल केला आहे. त्यांची या प्रकरणात चौकशी होणार आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात चित्रा वाघ आक्रमक झाल्यामुळे ही कारवाई झाल्याचे तर्क लढवले जात आहेत.
सविस्तर वाचा- भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ; 'या' कारणांसाठी पती किशोर वाघ यांची होणार चौकशी
- मुंबई - २७ फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकव विशेष मोहीम सुरू केली आहे. मराठीतील स्वाक्षरी मोहीम राज यांनी सुरू केली असून त्याला ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी पाठिंबा दिला आहे. लता मंगेशकर यांनी राज ठाकरेंकडे आपली मराठी स्वाक्षरी असलेले एक चित्र पाठवले आहे. राज ठाकरे यांनी फेसबुकवर याबाबत माहिती दिली.
सविस्तर वाचा- राज ठाकरे यांच्या 'मराठी स्वाक्षरी मोहिमे'ला लता मंगेशकरांचा पाठिंबा
- मुंबई - २७ फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकव विशेष मोहीम सुरू केली आहे. मराठीतील स्वाक्षरी मोहीम राज यांनी सुरू केली असून त्याला ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी पाठिंबा दिला आहे. लता मंगेशकर यांनी राज ठाकरेंकडे आपली मराठी स्वाक्षरी असलेले एक चित्र पाठवले आहे. राज ठाकरे यांनी फेसबुकवर याबाबत माहिती दिली.
सविस्तर वाचा- राज ठाकरे यांच्या 'मराठी स्वाक्षरी मोहिमे'ला लता मंगेशकरांचा पाठिंबा
- मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या अमली पदार्थांचा काळाबाजार सांभाळणाऱ्या मृत इक्बाल मिरचीची पत्नी हाजरा आणि दोन मुलांना ईडीच्या विशेष न्यायालयाकडून फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. याबरोबरच या तिघांच्या नावावर असलेल्या मुंबई, खंडाळा, पाचगणी येथील संपत्तीवर टाच आणण्याचे आदेशही विशेष न्यायालयाने दिले आहेत.
सविस्तर वाचा- इकबाल मिरचीच्या पत्नीसह मुले फरार आर्थिक गुन्हेगार घोषित, मालमत्तेवरही टाच
- नवी दिल्ली - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात १ मार्चपासून म्हणजेच सोमावारपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. यासंबंधीचा निर्णय २४ फेब्रुवारीच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांना सरसकट आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असणाऱ्यांना लस दिली जाणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्ध्यांना मोफत लस देण्यात आली होती.
सविस्तर वाचा- कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सोमवारपासून; कोणाला घेता येणार लस?
- मुंबई - अभिनेता अजय देवगणने शनिवारी चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांच्या आगामी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. १९६०च्या दशकात कामठीपुरामधील गंगूबाई, सर्वात शक्तिशाली, प्रेमळ आणि आदरणीय महिलेपैकी एक होती. गंगुबाईची भूमिका अभिनेत्री आलिया भट्ट साकारत आहे.
सविस्तर वाचा- अजय देवगणने 'गंगूबाई काठियावाडी'च्या शुटिंगला केली सुरुवात, भन्साळी खूश