- नवी दिल्ली : औरंगजेब मार्गावर असलेल्या इस्राईलच्या दूतावासाबाहेर नुकताच एक स्फोट झाला आहे. हा आयईडी ब्लास्ट असून, या स्फोटामध्ये चार ते पाच गाड्यांचे नुकसान झाले आहे. तसेच, घटनास्थळी तातडीने सुरक्षा दले पोहोचली.
सविस्तर वाचा- दिल्लीमध्ये इस्राईलच्या दूतावासाबाहेर स्फोट; मुंबईमध्ये अलर्ट जारी
- नवी दिल्ली - शुक्रवारी(29 जानेवारी) दिल्ली झालेल्या स्फोटामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालचा दौरा रद्द केला आहे. अमित शाह हे शुक्रवारी रात्री कोलकाता येथे येणार होते. तर, शनिवार आणि रविवार असे दोन दिवस शाह हे पश्चिम बंगालच्या दौऱयावर येणार होते. मात्र, हा दौरा आता रद्द करण्यात येत असल्याची माहिती पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.
सविस्तर वाचा- दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांचा बंगाल दौरा रद्द
- अहमदनगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारी म्हणजेच उद्यापासून उपोषण करणार होते. मात्र, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांशी चर्चा केल्यानंतर आज त्यांनी उपोषण मागे घेण्याचे ठरवले आहे. केंद्र सरकार उच्चाधिकार समिती स्थापन करणार, या प्रस्तावावर अण्णा समाधानी झाल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अण्णांचे उद्यापासूनचे उपोषण आंदोलन रद्द केल्याची घोषणा केली.
सविस्तर वाचा- अण्णा हजारेंचे उपोषण मागे; देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई
- सांगली - पश्चिम महाराष्ट्रात गाजलेल्या वारणानगर येथील 9 कोटी चोरीतील प्रमुख संशयिताचा थरारक पाठलाग करून निर्घृण खून करण्यात आला आहे. थरारक पाठलाग करून शहरातील गणेशनगर येथे हा खून करण्यात आला आहे. मैनुद्दीन मुल्ला,असे या मृताचे नाव आहे. सांगलीमध्ये भरदिवसा झालेल्या खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
सविस्तर वाचा- वारणानगर नऊ कोटी चोरी प्रकरण : सांगलीत मुख्य संशयिताचा पाठलाग करून निर्घृण खून
- पुणे - शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना अण्णा हजारे शांत राहतील, असे वाटत नाही. अण्णांच्या वयाचा विचार करता त्यांच्या तब्बेतीची काळजी वाटते, मात्र भाजप सत्तेच्या काळजीपोटी आणि आपल्यावर आफत येऊ नये, यासाठी अण्णांना उपोषणाला न बसण्याची विनंती करत आहे, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. ते पुण्यात बोलत होते.
सविस्तर वाचा- आपल्यावर आफत येऊ नये यासाठी भाजप नेत्यांकडून अण्णा हजारेंची मनधरणी...!
- मुंबई - कृषी कायदे रद्द व्हावे यासाठी दिल्लीत अजूनही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला गालबोट लागले आहे. दरम्यान, जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे देखील शेतकऱ्यांसंबधीत आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन होऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या अण्णाबरोबर भेटीगाठी सुरू आहेत. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, तुम्ही आधी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर करा. मग तुमचं आंदोलन सुरू करा, असा सल्ला अण्णा यांना दिला आहे.
सविस्तर वाचा- अण्णांच्या उपोषणावर संजय राऊतांचा घणाघात
- नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. तसेच, सरकारने असे आजिबात गृहित धरु नये की आंदोलक शेतकरी आपल्या घरी परत जातील, असा इशाराही त्यांनी दिला. ते दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
सविस्तर वाचा- आंदोलक शेतकरी घरी जाणार नाहीत; काँग्रेसचा त्यांना पूर्ण पाठिंबा - राहुल गांधी
- श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये आज झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. अवंतीपोराच्या मंदूरा त्राल या भागात ही दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यानंतर काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी याबाबत माहिती दिली.
सविस्तर वाचा- जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा..
- नवी दिल्ली - आयसीसीने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीला मजेशीररित्या ट्रोल केले आहे. आयसीसीने हसन अलीचे दोन फोटो 'चतुरपणे' शेअर करत ही खिल्ली उडवली. या पोस्टवर भारतीय आणि पाकिस्तानी चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. सध्या पाकिस्तान आपल्या घरच्या मैदानावर आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे.
सविस्तर वाचा- चक्क आयसीसीने उडवली पाकिस्तानच्या क्रिकेटपटूची खिल्ली!
- मुंबई - हल्ली प्रत्येक चित्रपट, सिरीयल, म्युझिक व्हिडीओ आदी चित्रित करतानाचे व्हिडीओसुद्धा चित्रित केले जातात. चित्रीकरणादरम्यान काय काय घडलं हे या पडद्यामागील चित्रणावरून कळते, ज्याला ‘बिहाइंड द सीन्स’ म्हणजेच ‘बीटीएस’ व्हिडीओज म्हटले जाते. वाघासारख्या चपळ डान्स-मूव्ह्स असलेला गाण्याच्या व्हिडिओ चित्रित होतानाच ‘बीटीएस’ व्हिडिओ, त्याने आपल्या समाज माध्यमावर पोस्ट केला व त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. टायगर श्रॉफने अलीकडेच त्याने गायलेले दुसरे गाणे ‘कॅसानोवा’ रिलीज केले होते. त्याचा म्युझिक व्हिडिओही लोकांना जबरी आवडला होता.
सविस्तर वाचा- टायगर श्रॉफने ‘कॅसानोवा’ च्या शूटचा ‘बीटीएस’ व्डिहिओ केला शेअर, फॅन्समध्ये जल्लोष!