जयपूर (राजस्थान) - दोन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस हवालदारांना जयपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. बोरिवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, हवालदार लक्ष्मण, हवालदार सचिन अशोक गुंडके आणि हवालदार सुभाष पांडुरंग नरके यांना एसीबीने जयपूरमध्ये अटक केली आहे.
सविस्तर वाचा - दोन लाखांची लाच घेताना मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यासह तीन हवालदारांना अटक; जयपूर एसीबीची कारवाई
मुंबई - आज राज्यात ५ हजार ४३९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १७ लाख ८९ हजार ८०० वर पोहोचला आहे. राज्यात आज ३० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४६ हजार ६८३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.६१ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ८३,२२१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
सविस्तर वाचा - राज्यात ५ हजार ४३९ नवीन कोरोना रुग्णांची वाढ; ३० मृत्यू
मुंबई - दिल्ली, राजस्थान आदी अन्य राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मात्र, आपल्याकडे अजून तरी तशी स्थिती नाही. यामुळे तुर्तास लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात टोपे यांनी ही माहिती दिली.
सविस्तर वाचा - 'लॉकडाऊनबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही'
मुंबई - टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून खुलासा करण्यात आल्यानंतर यासंदर्भात आतापर्यंत बारा जणांना अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाकडून याची चौकशी सुरू असताना यासंदर्भात मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. जवळपास 140 साक्षीदार व 1 हजार 400 पानांचे आरोपपत्र आहे.
सविस्तर वाचा - टीआरपी घोटाळा : मुंबई पोलिसांनी दाखल केले 1400 पानांचे आरोपपत्र; 140 साक्षीदारांचा समावेश
मुंबई - कोरोनाची दुसरी लाट येणार याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरी लाट आल्यास मुंबई महापालिका सज्ज आहे. मुंबईत कोरोना सेंटर, रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह तब्बल ७० हजार बेड्स सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
सविस्तर वाचा - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी बीएमसी सज्ज
मुंबई - राज्यात आणि मुंबईत शिवसेना आणि भाजपा हे पक्ष कट्टर विरोधक असल्याचे चित्र आहे. मात्र, हेच दोन्ही एकेकाळचे मित्र असलेले व आता कट्टर विरोधक बनलेले पक्ष बोरीवली येथील एका भूखंडावरून एकत्र आल्याचे पालिका सभागृहात पाहायला मिळाले. यावरून भूखंडाचे श्रीखंड खाण्यासाठी जुने मित्र एकत्र आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
सविस्तर वाचा - बोरीवलीतील भूखंडासाठी कट्टर विरोधक असलेले शिवसेना भाजपा महापालिकेत एकत्र
ठाणे - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आज पहाटेच ईडीचे छापे पडले. त्यांच्या ठाण्यातील घरांसह, मुंबईतील घरे आणि कार्यालयांवरही ईडीच्या पथकांचे छापे टाकण्यात आले. आज पहाटे सहा वाजेपासूनच ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई योग्य असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. तर, ही कारवाई राजकीय आकसापोटी होत असल्याचे म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याचा निषेध नोंदवला आहे.
सविस्तर वाचा - प्रताप सरनाईकांच्या घरावर ईडीचा छापा; शिवसेनेचे आणखी नेते रडारवर..
सातारा - महामार्गावर वर्षभरापूर्वी झालेल्या आनेवाडी टोलनाका धुमश्चक्री प्रकरणी खासदार उदयनराजे भोसले सुनावणीसाठी आज वाई न्यायालयात हजर झाले. उदयनराजे न्यायालयात उपस्थित राहणार असल्याने समर्थकांनी न्यायालय परिसरात गर्दी केली होती. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सविस्तर वाचा - आनेवाडी टोलनाका प्रकरण : खासदार उदयनराजे सुनावणीसाठी वाई न्यायालयात हजर
मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतला अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. मात्र, यासाठी 8 जानेवारीपूर्वी तिला पोलीस चौकशीला हजर राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात आदेशपत्र जारी केले आहे.
सविस्तर वाचा - कंगनाला अटकेपासून संरक्षण , 8 जानेवारीपर्यंत पोलीस चौकशीला हजर राहावे लागणार
मुंबई - राज्यातील विदर्भ, कोकण आदी भागातील धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या हमीभावापेक्षा 700 रुपये अधिक बोनस रुपाने शेतकऱ्यांना मदत म्हणून दिले जाणार आहेत. याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
सविस्तर वाचा - महाविकास आघाडीकडून धानउत्पादक शेतकऱ्यांना 700 रुपये बोनस - वडेट्टीवार