ETV Bharat / bharat

Top News Today : दिवसभरात कोठे काय असणार वाचा, एका क्लिकवर - Home Minister Amit Shah

आज दिवसभरात कोठे काय असणार, आजच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया या माध्यमातून. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. (Read Top News Today )

Top News Today
महत्त्वाच्या घडामोडी
author img

By

Published : Dec 8, 2022, 7:06 AM IST

मुंबई : गुजरात आणि हिमाचल राज्यात सत्ता कुणाची याचा फैसला आज होणार आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून या दोन राज्यातील निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात होणार आहे. महाराष्ट्र-कर्नाटस सीमावादावर आज मविआचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंची ( Home Minister Amit Shah ) भेट घेणार आहेत. खासदार सुप्रिया सुळेंनी ( MP Supriya Sule ) दिलेल्या माहितीनुसार दुपारी 12.40 मिनिटांनी ही भेट होणार आहे. या शिष्टमंडळात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे खासदार असणार आहेत. यासह देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. (Read Top News Today )

  • गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक मतमोजणी : गुजरातच्या 15 व्या विधानसभेच्या 182 जागांसाठी 1 आणि 5 डिसेंबर असे दोन टप्प्यात मतदान झाले.( Gujarat Election 2022 ) पहिल्या टप्प्यात 89 जागांवर तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान झाले. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपला विजय मिळू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गुजरातमध्ये 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 99 तर कॉग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. तर दोन जागांवर बीटीपी आणि एका जागा राष्ट्रवादी तर तीन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले होते. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला 16 जागांवर फटका तर काँग्रेसच्या 16 जागा वाढल्या होत्या. या निवडणुकीत आपने भाजप आणि काँग्रेसला थेट आव्हान दिल्याने कोणाची डोखं दुखी वाढणार अशी चर्चा आहे. तर हिमाचल प्रदेश विधानसभेच्या 68 जागांसाठी 12 नोव्हेंबरला मतदान झाले. गेल्या 37 वर्षापासून भाजप आणि कॉंग्रेसला अलटून पालटून सत्ता मिळाली आहे. एक्झिट पोलनुसार भाजप सत्तेच्या जवळ असल्याचे सांगितले जाते. तरीही दोन्ही पक्षात काटे की टक्कर होईल असा अंदाज आहे.
  • शरद पवारांनी दिलेला 48 तासांचा अल्टीमेटम आज संपणार? : कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून महाराष्ट्राच्या बसेसवर दगडफेक करण्यात आल्यानंतर राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यावर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत 24 तासात हल्ले थांबवा अन्यथा पुढच्या 48 तासात माझ्यासह महाराष्ट्रातील सर्व खासदारांना बेळगावच्या नागरिकांना धीर देण्यासाठी जावं लागेल असे वक्तव्य केले होते. पवारांच्या या वक्तव्यामुळे गेल्या 24 तासात राष्ट्रवादीकडून राज्यभर पडसाद उमटत होते. पवारांनी दिलेला अल्टिमेटम आज संपणार आहे.
  • महाविकास आघाडीचे खासदार दिल्लीत अमित शाहंची घेणार भेट : महाराष्ट्र-कर्नाटस सीमावादावर आज मविआचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंची भेट घेणार आहेत. खासदार सुप्रिया सुळेंनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी 12.40 मिनिटांनी ही भेट होणार आहे. या शिष्टमंडळात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे खासदार असणार आहेत.
  • आज पिंपरी बंदची घोषणा : महाराष्ट्रातील सर्व महापुरुषाच्या वारंवार होणाऱ्या अवमानाबद्दल आज पिंपरी चिंचवड शहरांमध्ये बंद पुकरण्यात आला आहे. छत्रपती संभाजीराजे दुपारी 12.30 वाजता पिंपरी चौक येथे उपस्थित रहाणार आहेत.
  • अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आजही सुनावणी : अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आजही हायकोर्टात युक्तिवाद सुरू राहणार आहे. आज दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण होऊन हायकोर्ट आपला निकाल राखून ठेवण्याची शक्यता आहे. सीबीआयचा देशमुखांना जामीन देण्यास जोरदार विरोध आहे.
  • उद्धव ठाकरे यांच्या मालमत्तेशीची संबंधित याचिकेवर सुनावणी : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांनी बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करत हायकोर्टात दाखल याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. सीबीआय आणि ईडी चौकशीची मागणी गौरी भिडे यांनी दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.