ETV Bharat / bharat

Top News Today : दिवसभरात कोठे काय असणार वाचा, एका क्लिकवर - अरविंद केजरीवाल

आज दिवसभरात कोठे काय असणार, आजच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया या माध्यमातून. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. (Read Top News Today )

Top News Today
महत्त्वाच्या घडामोडी
author img

By

Published : Dec 7, 2022, 6:59 AM IST

मुंबई : आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनाआधी पंतप्रधान मोदी ( Prime Minister Modi ) हे सकाळी 10 वाजता माध्यमांशी संवाद साधतील. संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र कर्नाटक वादाचे ( Maharashtra Karnataka dispute ) पडसाद उमटणार असून शिवसेना ठाकरे गट या प्रश्नावर सभागृहात आवाज उठवणार आहे. तर दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Union Home Minister Amit Shah ) यांना भेटण्याच्या तयारीत आहे. तसेच देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. (Read Top News Today )

  • आज दत्तजयंती : दत्तजयंती निमित्त भद्रावतीच्या दत्तमंदिर येथे दत्तजन्म सोहळा साजरा करण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता हा सोहळा होणार असून या वेळी 81 जोडप्यांच्या हस्ते महाआरती करण्यात येईल.तसेच नाशिकच्या प्रसिद्ध एकमुखी दत्त मंदिरात भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावणार आहेत. त्याचबरोबर शिर्डीत दत्त जयंती महोत्सव साजरा होतो . दत्त मंदिरात दत्त जन्माचे स्वागत करण्यात येते. अनेक पायी पालख्या देखील दत्त जयंतीला पोहचतात.
  • दिल्ली एमसीडीचा निकाल : दिल्ली महापालिकेचा निकाल लागणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. भाजपने तब्बल 7 मुख्यमंत्री, 17 कॅबिनेटमंत्री या निवडणुकीच्या प्रचारासाठी लावले होते. मात्र एक्झिट पोलनुसार आप या निवडणुकीत भाजपचा पराभव करेल असे दिसते. दिल्लीत 250 वॉर्डसाठी 1349 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. निकालानंतर दुपारी 3 वाजता अरविंद केजरीवालांचे ( Arvind Kejriwal ) भाषण होणार आहे.
  • कर्नाटक बँकेसमोर आंदोलन : राष्ट्रवादीतर्फे पवईमध्ये कर्नाटक बँकेसमोर सकाळी 11 वाजता आंदोलन केले जाणार आहे. कर्नाटकने हे हल्ले ताबडतोब थांबवावेत. सरकरने 48 तासांत परिस्थिती नियंत्रणात आणावी अन्यथा वेगळी भूमिका घ्यावी लागेल असा इशारा शरद पवारांनी दिला आहे.
  • नागरिकांची आज संवाद यात्रा निघणार : जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील नागरिकांची आज संवाद यात्रा निघणार आहे. देगलूर तालुक्यातील जागतिक वारसा असणारे ऐतिहासिक होट्टल (हेमाडपंथी मंदिर), बिलोली, धर्माबाद, उमरी ते संगमपर्यंत संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले. देगलूर येथील होट्टल मधून सकाळी 9 वाजता संवाद यात्रा निघणार आहे. सीमावर्ती भागातील नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी या कृति समितीकडून संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले. सीमावर्ती भागातील 150 खेड्यातील नागरिकांशी संवाद साधत जाणार ही यात्रा निघेल.
  • मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जालना जिल्हा बंदचे आवाहन : राज्यपाल भगतसिंग कोशारी तसेच भाजप नेत्यांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जालना जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले असून यामध्ये महाविकास आघाडीसह विविध संघटनांनी पाठिंबा दिलाय. सकाळपासून शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठान बंद ठेवण्याचा आवाहन व्यापाऱ्यांना तसेच नागरिकांना करण्यात आले.
  • संभाजी ब्रिगेडची बैठक : राज्यापलांबाबात पुढील भूमिका काय घ्यायची हे ठरवण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि इतर काही संघटनांची बैठक होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.