मुंबई : आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त ( Mahaparinirvan Day ) चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने आंबेडकरांचे ( Dr. Babasaheb Ambedkar ) अनुयायी दाखल होणार आहेत. सकाळी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येतील. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित राहतील. याबरोबरच गुजरातमधून आणलेल्या सिंहाची जोडी सुधीर मुनगंटीवारांच्या ( Sudhir Mungantiwar ) हस्ते संजय गांधी नॅशनल पार्क ( Sanjay Gandhi National Park ) मध्ये सोडण्यात येणार आहे. तर अनिल देशमुखांच्या जामीनावर आजपासून हायकोर्टात सुनावणी सुरू होणार. त्याशिवाय दिवसभरात कोठे काय असणार, आजच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया या माध्यमातून.
- आज महापरिनिर्वाण दिन : महापरिनिर्वाण दिनानिमित्त ( Mahaparinirvan Day ) चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने आंबेडकरांचे अनुयायी दाखल होणार आहेत. सकाळी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येतील. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित राहतील.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबडवे या मूळ गावी त्यांना अभिवादन : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी दर वर्षाप्रमाणे यंदाही त्यांना अभिवादन करण्यात येणार. आंबडवे येथे दरवर्षी आंबेडकर कुटुंबीय आणि आंबेडकरी अनुन्यायी यांच्याकडून प्रतिवर्षाप्रमाणे स्मारकात अस्थीकलश व बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून पूजन करून अभिवादन करण्यात येते.
- मुंबईत जंगलचा राजा येणार : गुजरातमधून आणलेल्या सिंहाची जोडी सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये सोडण्यात येणार आहे. ही सिंहांची जोडी काही दिवसांपूर्वी गुजरातेतील सक्करबाग प्राणी संग्रहालयातून मुंबईत दाखल झाली आहे. ती आज बोरिवली नॅशनल पार्क मध्ये सोडली जाईल.
- अमरावतीत पदयात्रा : काँग्रेसच्या वतीने शहरातील इर्विन चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नया अकोला येथे पदयात्रा काढली जाणार आहे. जवळपास 15 किलोमीटर ही पदयात्रा असून यामध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
- भाजपचा कोकण महोत्सव : शिवसेनेच्या कोकण महोत्सवाला भाजपच्या कोकण महोत्सवाने उत्तर दिले जाते आहे. आगामी मुंबई महानगर पालिकेसाठी शिवसेनेनंतर आता भाजपचा कोकणी मतांवर डोळा आहे. यामुळे गोरेगाव नेस्कोमध्ये भाजपने स्वराज्य भूमी कोकण महोत्सव आयोजित केला आहे. याचं उद्घाटन सकाळी साडेआठ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.
- राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा शेवटचा दिवस : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सहा दिवशीय कोकण दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे.
- शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषद : राज्य उत्पादन शूल्क मंत्री शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषद होणार आहे.
- अनिल देशमुखांच्या जामीनावर हायकोर्टात सुनावणी : अनिल देशमुखांच्या जामीनावर आजपासून हायकोर्टात सुनावणी सुरू होणार. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीनासाठी देशमुखांची याचिका, मुंबई सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्याच्या निर्णयाला आव्हान. देशमुखांच्या याचिकेत तथ्य आढळल्याने गुणवत्तेच्या आधारावर सुनावणी घेण्याचे हायकोर्टाने मान्य केले आहे.