ETV Bharat / bharat

Today Top News in Marathi : रश्मी ठाकरे यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार - TOP NEWS TODAY

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

Today Top News in Marathi : रश्मी ठाकरे यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार

author img

By

Published : Jan 27, 2022, 5:44 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार

मुंबई - प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे ध्वजारोहणाच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी तथा सामना दैनिकाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान केला असल्याची तक्रार पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे अ‍ॅड. डॉ. जयश्री पाटील यांनी केली आहे

मुंबईत चार मजली इमारत कोसळली.. ९ जणांना ढिगाऱ्याखालून काढले

मुंबई - शहरातल्या बांद्रा भागातील ए के मार्ग, बेहराम नगर, रजा मस्जिद जवळ एक चार मजली बांधकाम असलेले घर कोसळले आहे. दुपारी ४ च्या दरम्यान हे बांधकाम कोसळले असून, ढिगाऱ्याखाली काही जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी ९ जणांना बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आज वेरूळ अजिंठा लेणीची पाहणी करणार

औरंगाबाद - राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. (Tourist Spots Will Reopen) गुरुवारी ते वेरूळ अजिंठा लेणी परिसराची पाहणी करणार आहेत. लेणी परिसरात असणाऱ्या अडचणी बाबत अनेक वेळा तक्रारी आहेत. त्यामुळे त्या प्रत्यक्ष जाऊन पाहणार असून पाण्याची आणि विजेच्या समस्येबाबत जाणून घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

कोल्हापूर - पालकमंत्री सतेज पाटील यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः त्यांनी याबाबत फेसबुक पोस्ट द्वारे माहिती दिली आहे. तसेच, आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, आज दिवसभरात त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी भेट दिली होती.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंविरोधात मुंबईत एफआयआर दाखल

मुंबई - गलचे सीईओ पिचाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सुंदर पिचाई हे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत.

राहुल गांधी आज पंजाबमधील ११७ उमेदवारांसह सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी जाणार

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज पंजाबमधील विधानसभेचे 117 उमेदवारांसह दर्शनासाठी सुवर्ण मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मथुरा दौऱ्यावर जाणार आहेत.

नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाचे नेते जौऱ्यावर आहेत. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मथुरा दौऱ्यावर जाणार आहेत.

काल दिवसभरात

आज देशभर मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे.

नवी दिल्ली - आज प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम राजधानी दिल्लीत राजपथ इथे होईल. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संचलनाची मानवंदना स्वीकारतील. यावर्षी संचलन सकाळी १० ऐवजी साडे दहा वाजता सुरु होईल. रायसीना हिलपासून संचलनाला सुरुवात होऊन राजपथ, इंडिया गेटमधून लाल किल्ल्यापर्यंत जाणारी परेड यावर्षी केवळ नॅशनल स्टेडियमपर्यंत होणार आहे.

महाराष्ट्रात 10 जणांना पद्म पुरस्कार

मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी यावर्षी 128 पद्म पुरस्कारांना मान्यता दिली आहे. या १२८ जणांच्या यादीत महाराष्ट्रातील १० जणांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.