आज देशभर मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे.
नवी दिल्ली - आज प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम राजधानी दिल्लीत राजपथ इथे होईल. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संचलनाची मानवंदना स्वीकारतील. यावर्षी संचलन सकाळी १० ऐवजी साडे दहा वाजता सुरु होईल. रायसीना हिलपासून संचलनाला सुरुवात होऊन राजपथ, इंडिया गेटमधून लाल किल्ल्यापर्यंत जाणारी परेड यावर्षी केवळ नॅशनल स्टेडियमपर्यंत होणार आहे.
महाराष्ट्रात 10 जणांना पद्म पुरस्कार
मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी यावर्षी 128 पद्म पुरस्कारांना मान्यता दिली आहे. या १२८ जणांच्या यादीत महाराष्ट्रातील १० जणांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडीच महिन्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावणार
मुंबई - शस्त्रक्रिया झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काही कार्यक्रमांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली होती. मात्र, 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन सोहळयाला ते उपस्थित राहणार आहेत.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण होईल.
शेंदुर्णीच्या सुकन्याचा आज राजपथावर सांस्कृतीक कार्यक्रम
जळगाव - सुकन्या हि डॉ. चारुदत साने व डॉ. कौमुदी साने यांची मुलगी. हिने जर्मन या फॉरेन लँग्वेजमध्ये ग्रॅज्युएशन करून कथ्थक या हिंदुस्थानी शास्त्रीय नृत्याची पदवी संपादन केली.आज होत असलेल्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलनात सांस्कृतीक कार्यक्रमात शेंदुर्णीच्या ऐश्वर्या साने हिचे पाऊले थिरकणार आहेत.
गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय आणि ओबीसी नेते आरपीएन सिंह भाजपमध्ये
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न नेतृत्वाकडून सुरू असतानाच मंगळवारी पक्षाला मोठा धक्का बसला़ गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय आणि ओबीसी नेते आरपीएन सिंह यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला
उत्तर महाराष्ट्रासह राज्यात पुढील तीन दिवस मोठ्या प्रमाणात थंडी पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज
मुंबई - उत्तर महाराष्ट्रासह राज्यात पुढील तीन दिवस मोठ्या प्रमाणात थंडी पडणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये पुणे, नंदुरबार, धुळे या भागात जास्त थंडी आहे.
काँग्रेसने पंजाबमध्ये आणखी 23 उमेदवारांची यादी जाहीर केली.
नवी दिल्ली - काँग्रेसने 23 उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पुतण्याला अमरगढ जागेवरून तिकीट देण्यात आले आहे.
काल दिवसभरात
मुंबईत शाळा सुरू झाल्या आहेत. त्याबाबतचे नियम महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत.
मुंबई - शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा चालवण्यासाठी जुने नियम लागू आहेत. ज्या मुलांचे पालक परवानगी देतात, ती मुले शाळेत जातील. दोन्ही बेंचमध्ये 2 फूट अंतर असेल. वर्गातील मुलांची संख्या शाळा व्यवस्थापन ठरवेल अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांत मोठ्या प्रमाणात घट आढळून आली आहे
मुंबई - सोमवारी मुंबईत कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात घट आढळून आली आहे. यामध्ये दोन हजारांहून कमी कोरोना रुग्ण नोंदवले आहेत. याबाबत आरोग्य विभागाने माहिती दिली आहे. तसेच, लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
आज देशभर राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जात आहे
देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी पर्यटनाच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी भारत सरकारने २५ जानेवारी हा राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा केला. जागतिक समुदायामध्ये पर्यटनाचे महत्त्व आणि त्याचे सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक मूल्य याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
आज राष्ट्रीय मतदाता दिवस साजरा केला जातो
भारतीय निवडणूक आयोगाने 25 जानेवारी हा दिवास राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करणार असल्याचे जाहिर केले होते. 1950 पासून स्थापन झालेल्या निवडणूक आयोगाच्या 61 व्या स्थापना वर्षापासून 25 जानेवारी हा मतदाता दिवस म्हणून साजरा केला जातो.
भाजप-शिवसेनेमध्ये राजकारण तापले आहे. एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरू आहेत त्यावर आज संजय राऊत बोलण्याची शक्यता
शिवसेना-भाजपमधील संघर्ष चिघळत असून आता ट्विटर वॉर रंगले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी खुर्चीवर बसलेले बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन उभे असलेले कार्टून ट्विट करत कोण कोणामुळे वाढले,'उघडा डोळे बघा नीट' या मथळ्याखाली प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, यावरप्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांनी तिखट भाषेत प्रतिक्रिया दिली आहे.
उत्तरप्रदेशमध्ये भाजपची उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये 80 आमदार वगळणार असल्याची चर्चा
उत्तरप्रदेशमध्ये भाजपची उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये 80 आमदार वगळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यामध्ये कुणाचा नंबर लागतो हे आज कळू शकते.