माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना अखेर ईडीकडून अटक, आज न्यायालयात हजर करणार
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. काल सोमवार(दि. १ नोव्हेंबर)रोजी सकाळी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर त्यांची सुमारे १४ तास ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना अखेर मंगळवार (दि. २ नोव्हेंबर) रोजी रात्री उशिरा आटक करण्यात आली.
टी-२० विश्वकरंडकस्पर्धेत इंग्लंडची विजयासह सेमी फायनलमध्ये एन्ट्री,बटलरचं झंझावती शतक
इंग्लंड क्रिकेट संघाने टी-२० विश्वकरंडकस्पर्धेत सलग चौथा विजय मिळवला आहे. यष्टीरक्षक जोस बटलरने दमदार शतक ठोकलं. दरम्यान, त्याचवेळी इंग्लंडचा विजय पक्का झाला होता. त्यामुळे इंग्लंडने श्रीलंका संघाला 26 धावांनी मात देत विजय मिळवला. ग्रुपमध्ये सर्वाधिक विजय मिळवत सेमीफायनलमध्येही एन्ट्री श्रीलंका संघाने निश्चित केली आहे. प्रथम फलंदाजी करत बटलरच्या नाबाद 101 धावांच्या जोरावर इंग्लंडने 163 धावा केल्या.
आज (२ नोव्हेंबर) पत्रकार हल्ला विरोधी दिन
आज पत्रकार हल्ला विरोधी दिन आहे. जगभर मोठ्या प्रमाणात पत्रकारांवर हल्ले होत आहेत. तसेच, लोकशाहीने माध्यमांना दिलेले स्वतंत्र्याचा कुठेतरी मोठ्या प्रमाणात गैरवापरही होताना दिसत आहे. अशा काळात पत्रकार हल्ला विरोधी दिन साजरा होत आहे.
नीटमध्ये मुंबईतील कार्तिका नायर देशात पहिली
वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यामध्ये हैदराबाद येथील मृणाल कुट्टेरी, दिल्ली येथील तन्मय गुप्ता आणि मुंबईची कार्तिका नायर यांनी पैकीच्या पैकी (७२०) गुण मिळवले आहेत. त्यांनी देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
बंदर उभारणीसाठी खारफुटींची कत्तल
उरणनजीकच्या करंजा खोपटा खाडीनजीक उभारण्यात येत असलेल्या खासगी बंदरासाठी संबंधित कंपनीने किनाऱ्यावरील खारफुटींची शंभरहून अधिक झाडांची कत्तल केली असल्याचे निदर्शनास आले आहे. या कृत्याचा सुगावा लागू नये म्हणून कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एका बोटीतून ही तोडलेली खारफुटी खोल समुद्रात फेकली आहेत.
राज्यात दीड वर्षांत सर्वात कमी कोरोना रुग्णसंख्या
कोरोना रुग्णसंख्या रविवारी कमी असल्यानेच रुग्णसंख्याही कमी होती. दिवसभरात ८०९ नव्या रुग्णांचे निदान झाले असून, मे २०२० नंतर दिवसभरातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.
देशातील 3 लोकसभा जागेंचा आणि 30 विधानसभा जागेंचा आज निकाल
आज देशातील ३ लोकसभेसह ३० विधान सभेच्या जागेंसाठी मतमोजणी होत आहे. यामध्ये ३० विधानसभा जागांमध्ये १४ राज्यांच्या मतदारसंघांचा समावेश आहे. यात सर्वाधिक ५ जागा आसामच्या, ४ पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयातील प्रत्येकी ३, बिहार, कर्नाटक, राजस्थानमधील प्रत्येकी २ आणि महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाणा हरियाणा, मिझोराम, नागालँडमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.
आज सकाळी ९ वाजता नवाब मलिक पत्रकार परिषद घेणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आज सकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर मलिक यांनी गंभीर आरोप केल्यानंतर सध्या मलिक आणि भाजप, एनसीबी, फडणवीस असा वाद रंगला आहे.
हेही वाचा - देशमुखांना अटक होताच सोमैयांनी ट्विट केला व्हिडिओ, शरद पवारांसह मुख्यमंत्र्यांवर साधला निशाना
काल दिवसभरातील महत्वाच्या बातम्या
आज वसु-बारस.. दिवाळीची आजपासून सुरूवात
मुंबई - भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरु होते ती "वसु - बारस" या दिवसापासून. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर रवाना
नवी दिल्ली - पीएम मोदी G20 शिखर संमेलनसाठी रोम, इटलीची तीन दिवसीय दौरा आटोपून ब्रिटनच्या ग्लासगोसाठी रवाना झाले आहे. १ व २ नोव्हेंबर असे दोन दिवस ते ब्रिटन दौऱ्यावर असतील. मोदी दोन दिवस ग्लासगो येथे राहतील व ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांची भेट घेतील. दोन्ही नेत्यांमध्ये द्वीपक्षीय संबंध व हवामान बदलांबाबत चर्चा होईल.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आज गोवा दौऱ्यावर
पणजी - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आजपासून दोन दिवशीय गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सोमवारी सकाळी त्यांचे आगमन होईल, त्यांनतर ते गोव्यातील महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. सोबतच महाराष्ट्र गोमंतक पक्षाशी युतीबाबत चर्चा ही होणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आजपासून दोन दिवशीय गोवा दौऱ्यावर येत आहेत. या भेटीत ते गोव्यातील विविध नेते व कार्यकर्त्यांशी विभागवार भेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
आज जागतिक वीगन दिवस
1 नोव्हेंबरला संपूर्ण जगामध्ये वर्ल्ड वीगन डे साजरा केला जातो. वीगनमध्ये फळभाज्या, धान्य, कडधान्ये, डाळी, ड्रायफ्रूट्स या गोष्टींचा समावेश होतो. वीगन डे हा शाकाहारीचाच एक प्रकार आहे. शाकाहारी चळवळ ही अनाधी काळापासून सुरू आहे. 1994 साली पहिल्यांदा याच शाकाहारी चळवळीचा एक भाग म्हणून वेगन चळवळ सुरू करण्यात आली. प्राणी अधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या व्ही. फिलिप्स नावाच्या एका व्यक्तीने ही वीगन चळवळ सुरू केली.
अभिनेत्री अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचा आज वाढदिवस
बॅालिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आज ( 1 नोव्हेंबर) तिचा ४८ वा वाढदिवस साजरा करणार आहे. ऐश्वर्या अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे, तिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा फक्त भारतातच नाहीतर जगभरात आहे. एश्वर्या बॉलिवूडमधील पहिली अभिनेत्री आहे, जिचा मेणाचा पुतळा लंडनच्या मॅडम तुसाद येथे लावण्यात आला आहे. ऐश्वर्याचा जन्म १ नोव्हेंबर १९७३ रोजी कर्नाटकमधील मंगळुरू येथे झाला.