- आज दिवसभरात
- कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातील कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण करतील. हे राज्यातील सर्वात मोठी धावपट्टी असणारे विमातनळ आहे. याठिकाणी नोव्हेंबर महिन्यापासून नियमित उड्डाणे सुरू होणार आहे.
- टाटा पंच लाँच होणार -
Tata Punch एक छोटी एसयूवी कार आहे. ही कार 4-मीटरहूनही छोटी आहे आणि एक हैचबैक कारमध्ये एसयूवीचे फीचर्स उपलब्ध आहे. या कारची ऑनलाईन आणि ऑफलाईन बुकींग 21,000 रुपयात केली जाऊ शकते. आज या कारला लाँच करण्यात येणार आहे.
- BARC परिक्षेचे अॅडमिट कार्ड -
भाभा अणु संशोधन केंद्राच्या सुरक्षा रक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षेचे अॅडमिट कार्ड आज वेबसाईटवर जाहीर होणार आहे. barc.gov.in या वेबसाईटवर हे अॅडमिट कार्ड उपलब्ध होईल. यासाठी 29 ऑक्टोबरला परिक्षा होणार आहे.
- बिहार एसएससी पदभरती -
बिहार स्टाफ सिलेक्शन कमिशनने माइंस इन्स्पेक्टर पदासाठी जाहिरात काढली. या पदासाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. 100 जागांसाठी ही परिक्षा घेतली जाणार आहे.
- भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागचा जन्मदिवस -
आज भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागचा वाढदिवस आहे. त्याचा जन्म 20 ऑक्टोबर 2021ला दिल्लीत झाला.
- कालच्या बातम्या -
- मुंबई - प्रदेश काँग्रेसच्या कामात सुसूत्रता व वेग यावा यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी विविध समित्यांची पुनर्रचना करून विविध नेत्यांवर जबाबदारी दिली. यामध्ये माध्यम व संवाद विभागाची तसेच मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अतुल लोंढे यांच्यावर दिल्याने नाराज होऊन या पूर्वीचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे.
वाचा सविस्तर - महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ..! सचिन सावंत यांचा काँग्रेस प्रवक्तेपदाचा राजीनामा; लोंढेंच्या बढतीमुळे सावंत नाराज?
- मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवार २० ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. हा निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असून या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील.
वाचा सविस्तर - बुधवारी दहावी- बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर; असा पाहा निकाल!
- पुणे - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी येथील सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली.
वाचा सविस्तर - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांची सीरम इन्स्टिट्यूटला भेट
- मुंबई - सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान मुंबईच्या क्रूझ ड्रग्स प्रकरणात मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर शाहरुख आणि आर्यन खानच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत. त्यांनी शाहरुख खान आणि आर्यन खान यांचे नाव न घेता तपासाच्या नावाखाली बॉलिवूड आणि इंडस्ट्रीतील बड्या सेलिब्रिटींना लक्ष्य केल्याचे विधान केले आहे.
वाचा सविस्तर - जावेद अख्तर आले आर्यन खानच्या समर्थनार्थ, म्हणाले बड्या सेलिब्रिटींना लक्ष्य केलं जातंय
मुंबई - महाविकास आघाडी सरकारला सध्या चिंता लागली आहे ती केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा कसा थांबवायचा याची. मागील वर्षभरापासून केंद्रीय तपास यंत्रणा ईडी, सीबीआय, आयटी यांचा ससेमिरा हा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे लागलेला आहे. त्यातच भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमैया हे सातत्याने नव-नवीन भ्रष्टाचाराचे आरोप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर करत असल्याने या दोन्ही पक्ष प्रमुखांची झोप उडाली आहे. या संदर्भातच सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सह्याद्री अतिथगृहात सविस्तर चर्चा केल्याची माहिती आहे.
वाचा सविस्तर - केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा रोखण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची रणनिती, पवार-ठाकरे बैठकीत खलबते..
- वाचा आजचे राशीभविष्य -