ETV Bharat / bharat

Indian Independence Day हवामान बदल रोखण्यासाठी आजची तरूणाई सरसावली - Indian Independence Day

मानवी हस्तक्षेपांमुळे हवामान बदल झाल्याचे सर्वत्र दिसत आहेत. नुकसान भरून काढण्यासाठी काही तरुण पुढाकार घेत आहेत. भारतातील सतरा तरुण हवामान योद्ध्यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या वी द चेंज मोहिमेसाठी निवड करण्यात आली होती. हवामान कार्यकर्त्यांच्या तरुण पिढीचे प्रतिनिधीत्व करत ते विविध क्षेत्रात काम करत आहेत आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी उपाय शोधण्याच्या उद्देशाने काम करत आहेत Changemakers .

we the change
वी द चेंज
author img

By

Published : Aug 13, 2022, 5:52 PM IST

मुंबई मानवी हस्तक्षेपांमुळे हवामान बदल झाल्याचे सर्वत्र दिसत आहेत. नुकसान भरून काढण्यासाठी काही तरुण पुढाकार घेत आहेत. भारतातील सतरा तरुण हवामान योद्ध्यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या वी द चेंज मोहिमेसाठी Changemakers निवड करण्यात आली होती. हवामान कार्यकर्त्यांच्या तरुण पिढीचे प्रतिनिधीत्व करत ते विविध क्षेत्रात काम करत आहेत आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी उपाय शोधण्याच्या उद्देशाने काम करत आहेत.

आदित्य मुखर्जी दिल्लीत प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी आदित्य मुखर्जी मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. जवळपास 20 वर्षांचा आदित्य मुखर्जी Aditya Mukherjee गुडगावमध्ये राहतो. त्याच्या कृतीतील कचरा व्यवस्थापनाद्वारे सामाजिक जबाबदारी दिसून येते. उद्योगात 26 दशलक्ष प्लास्टिक स्ट्रॉ वापरण्यावर त्याने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. एक दिलेल्या मुलाखतीत त्याने कासवामध्ये अडकलेले प्लास्टिक काढताना होणारा त्रास व्यक्त केला. तेव्हा मानवी कृतीचा निसर्गावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांचा विचार त्याने केला आणि ही समस्या सोडवण्यात काहीतरी योगदान देऊ यासाठी प्रयत्न केले.

कृती तुला डिझाइन व्यवस्थापक क्रिती तुला Kriti Tula यांनी जागतिक परिधान उद्योगात सुमारे 12 वर्षे काम केले आहे. क्रिती डिझाइन क्षेत्रात लंडनमध्ये शिक्षण घेतले आहे. काम केल्यानंतर ती डूडलेजचा विस्तार करण्यासाठी भारतात परतली. भारताचा पहिला जागतिक फॅशन ब्रँड तयार करण्याचे तिचे उद्दिष्ट होते. ज्यात वापरलेल्या कपड्यांचा पनर्वापर करून नवीन कपडे तयार करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम केल्यामुळे उद्योगात किती कचरा निर्माण होतो आणि त्याचे परिणाम माहीत होते. कपडे कशी निसर्गाची हानी करू शकतात त्यावर काय उपाययोजना करमे गरजेच आहे. त्यावर सध्या ती काम करत आहे.

Aditya Mukherjee
आदित्य मुखर्जी

संजू सोमण केरळचे स्थायी असलेले संजू सोमण Sanju Soman आठ वर्षांपासून आदिवासी समुदायासोबत काम करत आहे. केरळमध्ये 30 टन कापड कचऱ्याचा पुन्हा वापर करून तो वापरण्याजोगा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याशिवाय केरळमध्ये उद्योग कमी स्वरूपात असल्याने स्टार्ट अप्सना मार्गदर्शन करत आहे. त्यासाठी ते अनेक स्तरांवर शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहे. त्याचा हा उपक्रम इकोसिस्टमसाठी खूप प्रभावित आहेत

Sanju Soman
संजू सोमण

स्नेहा शाही Sneha Shahi अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकोलॉजी अँड द एन्व्हायर्न्मेंट इन बेंगळुरू येथे पीएचडी करणारी विद्यार्थिनी स्नेहा ही जलसंरक्षक आहे. प्लास्टिकच्या वापरावर अंकुश ठेवण्याचे काम करत आहे. भारतातील जलस्रोत वाईट अवस्थेत आहेत आणि स्थानिक विविधता नष्ट होत आली आहे. स्नेहा यांच्या कामामुळे 700 किलो प्लॅस्टिक शहरी प्रवाहातून बाहेर काढण्यात मदत झाली आहे. आसाममध्ये राहत असतानाचा त्यांनी या कामाला सुरूवाकत केली होती. आसाममध्ये मुसळधार पाऊस पडतो. स्नेहाने 2019 मध्ये 350 विद्यार्थ्यांसह विद्यापीठात आणि शहरातील प्लास्टिकपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपला प्रवास सुरू केला होता. तिने स्थानिक विक्रेते दुकानदार, सरकारी, अधिकारी, यांच्यासोबत काम केले आणि त्यांना जैवविविधतेच्या आव्हानांबद्दल साक्षर केले.

Sneha Shahi
स्नेहा शाही

बेरजीस ड्रायव्हर Berjis Driver वास्तूविशारद आणि शहरी नियोजक बेरजिस यांनी मुंबई आणि अमरावतीमध्ये वैधानिक शहरी धोरण आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात योगदान दिले आहे. शहरी नियोजन हे मुख्यत्वे मोठ्या इमारती बांधण्यावर अवलंबून असते आणि या व्यवसायामुळे निर्माण होणारी पर्यावरणाची हानी गांभीर्याने घेतली जात नाही. हवामान बदलामुळे ही आणखी गंभीर चिंतेची बाब आहे. त्यामुळे बेरजिस ओपन स्पेस पॉलिसीसाठी काम करण्यास प्रवृत्त झाले. विकासाचा मोठा दबाव त्याठिकाणी आहे. हवामान बदलाचा सामना करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कमकूवत समुदायांना योग्य मार्गदर्शन देणे.

Berjis Driver
बेरजीस ड्रायव्हर

हेही वाचा Changemakers पाण्याच्या थेंबासाठी पुढे सरसावलेल्या जलयोद्ध्यांचा प्रेरणादायी प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.